Indapur Crime : इंदापूर पोलिसांनी पकडला 18 लाखांचा गुटखा; दोघे अटकेत
इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकलूज-इंदापूर महामार्गावर बंदी असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले.
Indapur Crime : इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकलूज-इंदापूर महामार्गावर (Food and Drugs) बंदी असलेल्या गुटख्याची (Gutkha) अवैध (Pune update) वाहतूक करणाऱ्या दोघांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत 18.08 लाख रुपयांचा गुटखा 24.08 लाख रुपयांचा माल जप्त केला. जप्तीची जबाबदारी पुणे ग्रामीण पोलिसांवर होती.
अकलूज-इंदापूर महामार्गावर गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलिस हवालदार सुनील बालगुडे, पोलिस हवालदार विकास राखुंडे यांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले. बुधवारी रात्री 9 वाजता बावडा ते इंदापूर दरम्यान छापा टाकला. त्यांनी एम.एच 13 डी.क्यू 2496 क्रमांकाचा लायसन्स प्लेट असलेला संशयित पिकअप ट्रक पकडला आणि एकूण 24.08 लाख रुपयांचा माल जप्त केला.
चालक व त्याच्या साथीदारास ताब्यात घेण्यात आले असून, इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता, अन्न सुरक्षा व मानक कायदा 2006 आणि महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांच्या मनाई आदेशानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईला धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात मोठी कारवाई केली होती. सुमारे 30 लाख 37 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती. पुणे कार्यालयाने वारजे माळवाडी परिसरातील मे. मुकेश सुपर मार्केट येथे विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला, व्ही. एन सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे 1 लाख 20 हजार 129 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला होता.
टोल फ्री क्रमांकारवर संपर्क साधण्याचं आवाहन
पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा तडाखा लावला आहे. ऐन दिवाळीत त्यांनी अनेक ठिकाणांवर कारवाई केली होती.