एक्स्प्लोर
मुलीला धडक देऊन पोलीस पुत्र फरार, कारवाईस पुणे पोलिसांची टाळाटाळ

पुणे : रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला चारचाकीनं धडक दिल्याची घटना पुण्यात घडली असून, याप्रकरणातला आरोपी मोकाटच आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणातला आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्यानं त्याच्यावर कारवाईस दिरंगाई केली जात असल्याचा आरोप होत आहे. पुण्यातील येरवडा परिसरात 26 फेब्रुवारी रोजी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप जगातप यांचा मुलगा अभिमन्यू जगताप याने रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला धडक दिली. या दुर्घटनेत मुलगी जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेतील आरोपी अभिमन्यूवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याने यावर कारवाईसाठी टाळाटाळ होत होती. पण या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर काल 3 मार्च रोजी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करुन द्यावा लागला. दरम्यान, अजूनही अरोपी फरार असल्याने, पोलीस पुत्राला अटक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























