Pune Police : पुणेकरांनो, पोलिसांना सूचना द्यायच्या आहेत? मग 'हा' Whatsapp नंबर लगेच मोबाईलमध्ये सेव्ह करा...
पुणे पोलिसांनी एक व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे. या नंबरवर महिलांसंदर्भात सुरक्षेबाबत सूचना किंवा अभिप्राय मागवला आहे.
Pune Police : मागील काही दिवसांपासून पुण्यात मुलींच्या अत्याचाराच्या आणि त्यांंच्यावर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी दामिनी पथकांची संख्यादेखील वाढवली आहे आणि त्यासोबतच आता पुणे पोलिसांनी एक व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे. या नंबरवर महिलांसंदर्भात सुरक्षेबाबत सूचना किंवा अभिप्राय मागवला आहे. नागरिकांच्या या सtचनांवर किंवा तक्रारींवर तातडीने कारवाईदेखील करण्यात येणार असल्यातं पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
'हा' आहे व्हॉट्सअॅप क्रमांक!
नागरिक 89759 53100 हा व्हॉट्सअॅप क्रमांक त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून त्याचा वापर करून आयुक्तांशी संपर्क साधू शकतात. आयुक्ताचं लोकांकडून अभिप्राय आणि सूचना गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये आयुक्तांनी म्हटले आहे की, "नमस्कार पुणेकरांनो..आपल्या मोबाईलमध्ये पोलीस आयुक्त 89759 53100 हा व्हॉट्स ॲप नंबर सेव्ह करा. तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना/अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकता. त्यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. तातडीच्या सेवेसाठी 112 डायल करा.
नागरिक आणि पोलिसांमधील अंतर कमी करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहे. त्यासोबत प्रत्येक परिसरात संध्याकाळी दामिनीपथकाकडून पाहणी केली जात आहे. सोबतच रात्रीच्या वेळीदेखील पोलीस गस्त घालताना रस्त्यांवर दिसत आहे. पुणे पोलिसांच्य़ा या प्रयत्नांमुळे गुन्हेगारीला खरंच आळा बसणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Pune...good evng..Save this Mobile No. am sharing below as CP WhatsApp Number in ur mobile
— CP Pune City Police (@CPPuneCity) July 10, 2023
89759 53100
Will be checking messages for FEEDBACK/INPUTS of your areas esp reg. women's safety among other topics to ensure strong focused actions
FOR EMERGENCY CONTINUE TO DIAL 112 PLS
दामिनी पथक रस्त्यावर...
यासोबत महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेसाठी अनेक नियम करण्यात आले आहे. त्यात - पुणे महिला पोलिसांची 25 दामिनी पथके नव्याने निर्माण होणार. आतापर्यंत 15 दामिनी पथके होती. ती वाढून 40 होणार आहे. पेट्रोलिंगसाठी आणखीन 100 बीट मार्शल नियुक्त करण्यात येणार आहेत. आतापर्यंत पेट्रोलिंग साठी 100 बीट मार्शल होते ते वाढून 200 होणार आहेत. पुणे पोलीस शहरातील महाविद्यालयांमधे समुपदेशन कार्यक्रम राबवणार आहेत तर पुण्यातील प्रत्येक पोलीस चौकी 24 तास सुरु राहणार आहेत.
पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज
पुण्याची लोकसंख्या 60 लाख आहे. पुण्यात आता एकूण 9500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र 12,500 पोलिसांची गरज आहे. त्या तुलनेत शहरात आता 2500 पोलिसांची गरज आहे. त्यामुळे शहरात एक झोन, 7 नवे पोलीस स्टेशन आणि 1 पोलीस उपायुक्तांची मागणी आयुक्तांनी राज्य सरकारकडे केली आहे.
हेही वाचा-