पुणे : सध्या महिला प्रत्येकच क्षेत्रात उत्तम कामगिरी करताना (Pune news) दिसत आहे. प्रत्येक क्षेत्रात (Shirur News) महिलांनी आपलं वेगळेपण जपत ठसा उमटवला आहे. नवनवे प्रयोग करत वेगवेगळे उपक्रम राबवतानादेखील महिला दिसतात. दरम्यान पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील ती महिलांना एकत्र येत गावातील नागरिकांना ग्रामीण आणि शहरी संंस्कृतीची ओखळ करुन देण्यासाठी थेट मोठी जत्रा उभारली होती. या जत्रेचं सर्व नियोजन तीन महिलांनी केल्याने या जत्रेची सध्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. घोडथडी जत्रा असं या जत्रेला नाव देण्यात आलं होतं. यात अनेक महिलांना आपला लहान व्यावसाय मोठ्या स्तराला नेण्यात मदत मिळाली. महिलांनीच महिलांसाठी उभं केलेल्या या व्यासपीठामुळे जत्रेला वेगळं स्वरुप प्राप्त झालं. 


शिरूरमधील राजमाता फाऊंडेशन आणि युवा स्पंदन सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घोडथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. नवउद्योजक, महिला उद्योजकांना संधी मिळावी, विविध रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा, विविध सांस्कृतीक कार्यक्रम, कलाप्रकारांचे दर्शन व्हावे या उद्देशाने शिरूर मधील गौरी घावटे, वैशाली रत्नपारखी आणि प्रियांकाधोत्रे यांनी या जत्रेचे आयोजन केले. तिन्ही महिलांच्या या कामाचं अनेक स्तरावरुन कौतुक होत आहे. यात पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनीदेखील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हजेरी लावली शिवाय महिलांनीच आपले पाय भक्कम रोवून उभं राहावं आणि स्वावलंबी बनावं, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. विविध खाद्यपदार्थ, हस्तकलेतील वस्तू,सजावटीचे सामान, विशेष मुलांनी तयार केलेल्या पणत्या आकाशकंदील, आरोग्यदायी पदार्थ, केमिकल विरहित धान्य, हाताने बनवलेली सौंदर्य प्रसाधने, दागिने हे या जत्रेचे वैशिष्ट्य आहे. 


सध्या सोशल मीडियाचं जग आहे. त्यामुळे अनेकांना शहरी संस्कृतीचं दर्शन होत असतं. मात्र अनेक लहानग्यांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करुन देण्यासाठी या जत्रेचं आयोजन करण्यात आलं. अनेक लहानग्यांना या माध्यमातून  ग्रामीण संस्कृती अनुभवता आली. शिवाय यात विविध प्रकारची माहितीदेखील अनेकांपर्यंत पोहचवण्यात आली. 


महिलांना रोजगाराची संधी...


 या जत्रेत ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा मिलाप दिसला तर त्यासोबतच अनेक महिलांनादेखील रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. यातून बचत गटातील महिलांना मोठी संधी मिळाली शिवाय अनेक गरजू महिलांची दिवाळीदेखील गोड झाली. 


इतर महत्वाची बातमी-