पुणे : सर्वमान्यांना एक न्याय आणि केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबाला दुसरा न्याय, असा पुणे महापालिकेचा (PMC)  कारभार चालत असल्याच समोर आलं आहे.  कारण केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane)  यांच्या मालकीच्या पुण्यातील डेक्कन भागातील आर डेक्कन मॉलने महापालिकेचा तब्बल 3 कोटी 77 लाख रुपयांचा मालमत्ताकर थकवल्याच उघड झाल्यावर महापालिकेकडून या मॉलचा वरचा मजला बुधवारी सील करण्यात आला होता. मात्र आता ही रक्कम चुकून आकारल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.


एवढंच नाही तर महापालिकेचे कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी मिळकतकर थकलेली मालमत्ता राणे कुटुंबीयांच्या मालकीची असल्याचं कॅमेरासमोर सांगितल होतं.  मात्र त्यानंतर आलेल्या राजकीय दबावामुळे महापालिका प्रशासनाने या कारवाईपासून यु टर्न घेतल्याच समोर आलंय. कारण 3 कोटी 77 लाखांचा मालमत्ताकर थकवलेल्या राणेंच्या कंपनीकडून फक्त पंचवीस लाखांचा चेक दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने राणेंच्या या मालमत्तेचे सील उघडायच ठरवलं आहे.  उरलेली रक्कम महापालिकेकडून चुकून आकारण्यात आल्याचा राणे कुटुंबाकडून करण्यात आलेला दावा मान्य करत महापालिकेकडून या मॉलचा सील उघडाच ठरवलय. त्यामुळे सर्वसामान्यांनी मालमत्ताकर थकल्यावर त्यांच्या घरासमोर बॅड वजवणारे महापालिकेचे प्रशासन राणेंचा तब्बल 3 कोटी 52 लाख रुपयांचा मालमत्ताकर माफ करण्यास तयार कसे झाले असा प्रश्न विचारला जात आहे.


त्याचबरोबर पुण्यात मालमत्ताकर थकवल्यांतर अशा प्रकारे आक्षेप घेणाऱ्यांची एकत्रित रक्कम साडेआठशे कोटी रुपये इतकी आहे त्यामुळे इतरांची कराची रक्कम देखील अशीच माफ करण्यात येणार का?, असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांकडून विचारण्यात येतोय. एवढंच नाही तर राणेंच्य बातमीत देण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे  पत्र महापालिकेकडून काढण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बुधवारी राणे कुटुंबाकडून करण्यात थकवण्यात आल्याच सांगणाऱ्या महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्याच सहीने हे पत्र प्रकाशित करण्यात आलं आहे.


अधिकारी पोहचले अन् कारवाई केली पण...


महानगरपालिकेकडून गेले काही दिवस पुण्यात अशा पद्धतीने कारवाया सुरू आहेत. ज्या ठिकाणी कोट्यावधी कर थकीत आहेत, त्यांच्यावर अशी ही कारवाई केली जात आहे. अशा कारवाई करताना आधी नोटिफिकेशन पाठवण्यात येते आणि त्याच्यानंतर ही कारवाई केली जाते.  पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये एक मोठा मॉल आहे. यात रेंटवर अनेक वेगवेगळे दुकानं आहेत. याच ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई करताना पुणे महानगरपालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोचलेले होते आणि त्यांनी ही कारवाई होती.


इतर महत्वाची बातमी-


अशोक चव्हाणांना शिंदे-फडणवीसांचं दुसरं गिफ्ट, साखर कारखान्यासाठी 150 कोटी थकहमी, हर्षवर्धन पाटील, महाडिक, कल्याण काळेंसह 11 जणांवर मेहरबान!