Maharashtra Live Blog Updates: कराडमधील सह्याद्री हॉस्पिटलची आग आटोक्यात, 43 रुग्णांचा जीव वाचला

Maharashtra Live Blog Updates: 5 जुलैच्या विजयोत्सवाच्या आयोजनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या घडामोडींसह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 04 Jul 2025 09:33 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: शक्तीपीठ महामार्गविरोधात आंदोलन केल्याने राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राजू...More

नाशिक शहरात डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर; महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची गर्दी

नाशिक : पावसाळा सुरू होताच नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालीये. मागील आठवड्यात १६ रुग्ण आढळले, तर आतापर्यंत १३७ रुग्णांची नोंद झालेली आहे. आणि सध्या २५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत मोठी घट आहे. मागील वर्षी जूनमध्ये १६५ रुग्णांवर उपचार सुरू होते. महापालिकेच्या आरोग्य विभागानं विशेष उपाययोजना सुरू केल्या असून, झोपडपट्टी, नाले व जलसाठ्यांची तपासणी सुरू आहे. डेंग्यूचा प्रसार मुख्यतः Aedes नावाच्या मच्छरांमुळे होतो. हे मच्छर सकाळी आणि संध्याकाळी चावतात आणि घरातल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. डेंग्यूची मुख्य लक्षणं म्हणजे ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी, उलटी आणि त्वचेवर लाल चट्टे. लक्षणं दिसताच तातडीने डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलाय. तर महापालिकेने फॉगिंग, औषध फवारणी आणि जनजागृती मोहिमा सुरू केल्या आहेत. तरीसुद्धा नागरिकांनी घरात पाणी साचू देऊ नये, डेंग्यूचा ताप ओसरल्यावरही रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. त्यामुळे रक्ताच्या तपासण्या आवश्यक असल्याचेही पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी आवाहन केलंय.