Horoscope Today 3 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 3 जुलै 2025, आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज प्रगतीचा मार्ग समजावून घेताना, कष्टाला आपलेसे केले तर यश निश्चित मिळेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रेमींना जोडीदाराचा सहवास मिळेल, परंतु नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असतात, याचा अनुभव पण घेणार आहात मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज पैशाच्या संदर्भातील अनेक कामे होऊन जातील अपेक्षित जुनी आणि वसूल होतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्या मूळच्या भावनिक व्यक्तिमत्त्वाला खतपाणी मिळून दानधर्म करण्याचे योग येतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो थोडे हुकूमशाही वृत्तीने हाताखालच्या लोकांकडून काम करून घ्याल स्वभावातील लहरीपणा वाढेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज बुद्धीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावाल नवीन कल्पनांचा जन्म होईल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज कामाचे योग्य नियोजन केले नाही तर ती पूर्ण होणार नाहीत, महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कठोरतेचा चाबूक आणि शिस्तीचा दंडा कायम तुमच्या हातात असतो, त्यामुळे कोणाचाही विचार न करता आपल्या मनासारखे काम करून घ्याल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज प्रकृती स्वास्थ्य चांगले राहिले तरी, पथ्य पाणी जरूर सांभाळा, तुमचा उत्साह वाखाणण्यासारखा असेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज ज्या ठिकाणी तुम्हाला मान आहे, त्या ठिकाणी आवर्जून हजेरी लावाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज अधिकाऱ्याच्या जागेवर असणाऱ्यांना मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज कामाचा उरक चांगला राहील, जबाबदारीने काम करत असल्यामुळे मोठी कामे अंगावर पडतील.
हेही वाचा :
Lucky Zodiac Sign: 3 जुलै तारीख चमत्कारिक! 'या' 5 राशींवर स्वामींची असेल मोठी कृपा, नशीब असे पालटेल की पैसा येईल बक्कळ
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)