पुणे :  पुणे जिल्हा बँक (PDCC Bank Head Office) संचालकपदाचा अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पुणे जिल्हा बँक संचालकपदाचा फैसला झाला आहे पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे (Ranjit Taware) यांची वर्णी लागली आहे. काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा देण्यात आला होता. त्यानंतर आता संचालकपदी रणजित तावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे संचालक पदासाठी पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या नावाची चर्चा होती.


काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संचालय पदाचा राजीनामा दिला होता. उपमुख्यमंत्रीपद त्यानंतर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर कामाचा व्याप वाढल्याचं सांगत अजित पवारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु होती. मध्यंतरी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र अजित पवारांनीच संचालकपदी रणजित तावरे यांची निवड केली आहे.  जिल्हा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये विद्यमान चेअरमन दिगंबर दुर्गाडे यांनी या रणजित तावरे यांचं नाव संचालकपदासाठी सुचवलं होतं. 


 कोण आहेत रणजित तावरे?


-रणजित तावरे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते  


-अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले बाळासाहेब तावरे यांचे रणजित तावरे हे पुतणे आहेत.


-मागील अनेक वर्ष बाळासाहेब तावरे हे माळेगाव साखर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. 


-काहीच दिवसांपूर्वी बाळासाहेब तावरे यांनी माळेगाव साखर सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता.  


-त्यानंतर  माळेगाव साखर सहकारी साखर कारखान्यावर अॅड. केशव जगताप यांची नियुक्ती झाली होती. 


-त्यानंतर आता  बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित तावरे यांची वर्णी पुणे जिल्हा बँक संचालकपदी लागली आहे.


देशातील नंबर 1 ची बँक


मागील 32 वर्षांपासून अजित पवार जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी कार्यरत होते. 1991 पासून त्यांनी या बॅंकेच्या संचालकपदाची धुरा हाती घेतली होती. त्यांनी या बॅंकेची मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती केली. अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील देशातील नंबर 1 ची बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नावलौकिक मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात आणि पुण्यातील बँकेच्या क्षेत्रात मोठी चर्चा सुरु झाली आहे.


इतर महत्वाची बातमी-