Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 19 Oct 2021 08:50 AM
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महाविद्यालये उद्यापासून सुरु होणार?

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देखील उद्यापासून महाविद्यालये सुरु करण्याच्या सूचना दिल्यात.  मात्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील किती महाविद्यालये उद्या लगेच सुरु होतील याबद्दल शंका आहे. कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऐनवेळेस महाविद्यालयांना काम सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विद्यापीठाचे यावर्षीचे पहिले शैक्षणिक सत्र उद्या म्हणजे वीस ऑक्टोबरलाच संपत आहे.  त्यामुळे उद्या लगेच पुणे जिल्ह्यातील किती महाविद्यालये सुरु होतील याबद्दल शंकाच आहे.

आयकर विभागाच्या छापेमारीचा जित पवारांना काही फरक पडणार नाही : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Income Tax Raid : आयकर विभागाने छापेमारी केली असली तरी त्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही फरक पडणार नाही. असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे. शिवाय अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जी पाच दिवसांची चौकशी झाली, ती आयकर विभागाने तातडीनं करायला हरकत नव्हती. असं ही आठवलेंनी यावेळी सूचित केलं. पण आयकर विभाग, ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांकडून सुरु असणाऱ्या चौकशीमागे केंद्राचा कोणताही हात नाही. हे सांगायला आठवले विसरले नाहीत. 

पुणे शहरातील हडपसर आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन खून; गुन्हा दाखल

Pune News : पुणे शहरातील हडपसर आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कल काल रात्री दोन खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मंदार जोगदंड (वय 23) याचा दत्तवाडीत तर प्रदीप शिवाजी गवळी (वय 26) याचा हडपसर परिसरात खून झाला. या खुनप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाची 3 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी

Pune Mhada Lottery :  पुणे आणि परिसरात घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. मुंबई आणि परिसरानंतर बहुतांश लोकांचा कल हा पुण्यात घर घेण्याचा असतो. दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाच्या (Mhada) वतीनं तब्बल 3 हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या घरांमध्ये जवळपास दीड हजार घरं 20 टक्क्यातील आणि नामांकित, मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. गेल्या एक - दीड वर्षांत आठ हजार घरांची सोडत काढण्यात आली होती. अशातच एका वर्षांत घरांच्या लॉटरीची 'हॅटट्रिक' करत  पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी आणखी एक विक्रम केला आहे. कोरोनाता प्रादुर्भाव आणि त्यामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन यांमुळे अनेकांची आर्थिक बाजू कोलमडली आहे. अशातच गरिब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला आहे. याआधी कोरोनापूर्वी जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीनं आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी म्हणजेच, 5 हजार 657 घरांची सोडत काढण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही घरांची लॉटरी काढण्यात आली होती.  

पार्श्वभूमी

खुशखबर... दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाची 3 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी; नामांकित बिल्डर्सच्या प्रकल्पातील घरांचाही समावेश

Pune Mhada Lottery :  पुणे आणि परिसरात घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. मुंबई आणि परिसरानंतर बहुतांश लोकांचा कल हा पुण्यात घर घेण्याचा असतो. दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाच्या (Mhada) वतीनं तब्बल 3 हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या घरांमध्ये जवळपास दीड हजार घरं 20 टक्क्यातील आणि नामांकित, मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. गेल्या एक - दीड वर्षांत आठ हजार घरांची सोडत काढण्यात आली होती. अशातच एका वर्षांत घरांच्या लॉटरीची 'हॅटट्रिक' करत  पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी आणखी एक विक्रम केला आहे. कोरोनाता प्रादुर्भाव आणि त्यामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन यांमुळे अनेकांची आर्थिक बाजू कोलमडली आहे. अशातच गरिब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला आहे. याआधी कोरोनापूर्वी जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीनं आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी म्हणजेच, 5 हजार 657 घरांची सोडत काढण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही घरांची लॉटरी काढण्यात आली होती.  

म्हाडाच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही सर्वसामान्यांसाठी घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती. यावेळी पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत म्हाडाने काढली होती. अशातच आता दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडा आणखी तीन हजार पेक्षा अधिक घरांसाठी लॉटरी काढत आहे. यामध्ये दीड हजार घरं वीस टक्क्यातील आणि सर्व नामांकित, मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती नितीन माने पाटील यांनी दिली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.