Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 26 Oct 2021 08:43 AM
पुण्यात सीरम इंस्टीट्यूटच्यामागे एका व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या बिबटयाला पकडण्यात अखेर यश

मंगळवारी सकाळी पुण्यातील हडपसर मधील सीरम इन्स्टिट्यूटच्या कंपाऊंड वॉलजवळ एका व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या बिबटयाला पकडण्यात अखेर यश आलंय.  सीरम इन्स्टिट्यूटच्या पाठीमागच्या बाजूस मॉर्निंग वॉक साठी गालेल्या संभाजी आटोळे नावच्या व्यक्तीवर हल्ला करून हा बिबट्या हडपसर मधील आणखी दाट लोकवस्तीत शिरला होता.  त्यामुळे त्याला पकडण्याचे आवाहन वन विभागासमोर होते.  दिवसभर या बिबट्याचा शोध घेतल्यावर तो दोन भिंतींच्या मधे असलेल्या जागेत लपून बसला होता.  वन विभागाच्या अधिकारार्यांनी अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर जिळीच्या सहाय्याने या बिबट्याला पकडण्यात यश मिळवलंय.  हा बिबट्या पुर्ण वाढ झालेला असल्याच वन विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आलय.

दिवाळीनिमित्त आठवडाभर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सुटी

दिवाळी व रविवारच्या सुट्ट्यांमुळे  सलग आठवडाभर ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर  दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कामकाज बंद राहणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर रविवारची सुटी, १ नोव्हेंबर रोजी २६ सप्टेंबर रोजी झालेल्या अधिसभेची पर्यायी सुटी, २ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, ३ नोव्हेंबर रोजी १० जानेवारी रोजी झालेल्या अधिसभेची पर्यायी सुटी, ४ व ५ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन व बलिप्रतिपदेची सुटी, ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या शनिवारची सुटी तर रविवार ७ नोव्हेंबर रोजीही सुटी आहे. विद्यापीठाचे कामकाज ८ नोव्हेंबरपासून सुरळीत सुरु असेल असेही विद्यापीठ प्रशासनाने कळवले आहे.

किरण गोसावीचा पुणे पोलिसांना गुंगारा

किरण गोसावीच्या शोधासाठी आज पुणे पोलिसांचे पथक लखनौमध्ये पोहोचले होते. पण गोसावीने पुणे पोलिसांना गुंगारा दिला आहे. गोसावीचं शेवटचं लोकेशन उत्तर प्रदेशमधील फत्तेपुर असल्याची सूत्रांची माहिती आहे. पुणे पोलिसांची दोन पथके  उत्तरप्रदेशमध्ये गोसावीला पकडण्यासाठी शोध घेत आहेत. 

पार्श्वभूमी

पार्श्वभूमी


गंगाराम आई माता मंदिराजवळ लागलेली आग आटोक्यात, कुलींगचे काम सुरू



गंगाराम आई माता मंदिराजवळ लागलेली आग आटोक्यात आलेली आहे. घटनास्थळी कुलींगचे काम सुरू आहे. या गोडाउनमध्ये जवळजवळ दोन कोटी रुपयाचं सामान होतं. पण या आगीच्या घटनेत पूर्ण जळून खाक झालेलं आहे. 



किरण गोसावीवर फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल



किरण गोसावीवर फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यात एक महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोसावीने शरण येण्या संदर्भात कोणताही संपर्क पुणे पोलिसांशी साधलेला नाही. पुणे पोलिसांच्या दोन टीम राज्याबाहेर त्याच्या शोध घेत आहेत. 


 पुण्यात करण्यात आले भीक मागो आंदोलन



पाण्याची गुणवत्ता तपासून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोग शाळेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर शासनाने खाजगीकरणाची कुराड चालवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत असा आरोप करत आज राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला. आज भूजल भवन येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणानी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अकरा महिन्याचे नियुक्ती आदेश संपुष्टात आल्यानंतर पुनर्नियुक्ती आदेश न देता कालावधी संपलेल्या कर्मचाऱ्यांना काम करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी तपासणी प्रयोगशाळा बंद पडल्या आहेत. दिवाळी तोंडावर आल्यानंतरही पुनर्नियुक्ती आदेश व थकीत चार ते पाच महिन्याचे मानधन न मिळाल्याने आज भीक मागो आंदोलन केलं आहे. 


नगरसेवकाने उखडला सायकल ट्रॅक  



वाहतुकीला अडथळा ठरत असलेला हडपसर येथील उड्डाणपूलाजवळील सुमारे दोनशे मीटर लांबीचा सायकल ट्रॅक एका नगरसेवकाने जेसीबी यंत्राच्या साह्याने उखडून टाकला आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही अडचणीचा ठरत असलेला हा ट्रॅक पालिकेकडून  काढला जात नसल्याने ही कृती करावी लागल्याचे या नगरसेवकाने सांगितले.नगरसेवक योगेश ससाणे यांनी याबाबत वारंवार निवेदने देवून प्रशासनाकडे हा ट्रॅक काढून रस्ता रूंद करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज जेसीबी लावून हा संपूर्ण ट्रॅक उखडून टाकला आहे.



 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.