Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
जिजामाता इंग्लिश स्कूल पिंपरी चिंचवड सेंटरमध्ये आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांना अवैद्यकीय सहाय्यक पेपर कोड 35 न देता इतर पदांचे 28, 39 व इतर पदांचे पेपर देण्यात आले, सदर बाबत विद्यार्थ्यांना अवैद्यकीय सहाय्यक पेपर कोड 35 नुसार पदासाठी अर्ज केले होते परंतु प्रत्यक्ष पेपर विद्यार्थ्यांना इतर पदांचे पेपर देण्यात आले हा प्रकार पर्यवेक्षकांना निदर्शनास आणून दिला होता. परंतु त्यांनी सदर चुकीचा पेपर विद्यार्थ्यांना दिला तोच पेपर तुमचा आहे असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांची तक्रार संबंधित पर्यवेक्षकांनी ऐकून न घेता वरिष्ठांकडे तक्रार करा तोच पेपर आलेला आहे, असे सांगण्यात आले तरी विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय व पर्यवेक्षकावर योग्य ती कारवाई करून अवैद्यकीय सहाय्यक पेपर कोड 35 नुसार पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी मध्यवर्ती बिल्डिंग मा. संचालक आरोग्य सेवा पुणे येथे अर्चना पाटील ,संचालक आरोग्य संचनालय ,पुणे यांना निवेदन देण्यात आले.
पुणे आझम कॅम्पस आबेदा इनामदार कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी आरोग्य विभागाची परीक्षा सकाळी दहा वाजता सुरू होणे अपेक्षित होती. मात्र या ठिकाणी झालेल्या गोंधळानंतर ही परीक्षा साडेअकराच्या सुमारास सुरू करण्यात आली. या केंद्रावर स्वतः पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आरोग्य विभागाचे उपसंचालक संजोग कदम पोचल्यानंतर ही परीक्षा सुरू करण्यात आली.. मात्र विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या केंद्रावर कुठलंही नियोजन या परीक्षेसाठी करण्यात आलं नव्हतं असा आरोपी विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी पोचले आहेत..
बारामती तालुक्यातील पारवडी येथे बापाने सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाने वनविभागाच्या झाडीत लपलेल्या आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली. पोलिसानी सावत्र मुलाचा खुन करुन पसार झालेला आरोपी 3 तासाच्या आत अटक करुन जेरबंद केला आहे.
पार्श्वभूमी
पार्श्वभूमी....
मी कोणताही कारखाना विकला नाही : हर्षवर्धन पाटील
मी सहकारमंत्री असताना सहकारी साखर कारखाने विकले गेले पण सहकार मंत्री म्हणून माझी त्यामधे भूमिका नव्हती. मी कोणताही कारखाना विकला नाही. कारण कारखान्याची विक्री कारखान्याला कर्ज देणारी बॅंक किंवा महामंडळ करत असते. कुठल्या साखर कारखान्यांची विक्री करण्यात आलीय याची यादी माझ्याकडे आल्यावर मी यावर बोलेन. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने प्रति हेक्टर 10 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. पण ती तुटपुंजी आहे. सरकारने या दहा हजार रुपयांच्या व्यतिरिक्त आणखी चाळीस हजार प्रति हेक्टर मदत द्यावी. राज्यातील पंचावन्न लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालय असं सरकार म्हणतय पण प्रत्यक्षात हा आकडा शंभर लाख प्रति हेक्टर आहे. सरकारने ही मदत दिली नाही तर आम्ही दिवाळीनंतर आंदोलन करू.
लोणी काळभोर परिसरात झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये टोळीयुद्धात काल दोघांची हत्या झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. काल संतोष जगताप नावाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाची गोळीबार करून हत्या करण्यात आली तर संतोष जगतापच्या खाजगी अंगरक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मारेकऱ्यांपैकी स्वागत खैरे नावाचा तरुण मारला गेला होता. दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी पुण्यात टोळीयुद्धातुन झालेला हा गोळीबार पोलीस दलासमोरही प्रश्न निर्माण करणारा आहे.
शेतात पिकवला गांजा, पोलिसांकडून दोघांना अटक
पुणे शहर पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलने दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी त्यांच्या शेतावर गांजाचे उत्पादन करून त्याची विक्री केली आहे. पोलिसांनी 11 लाख रुपये किमतीच्या गांजाची एकूण 250रोपे जप्त केली आहे. यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
नवले पुलाजवळ सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा अपघात
पुणे- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनाला जोराची धडक दिली. या विचित्र अपघातात एक चारचाकी, एक दुचाकी व एका टेम्पोचे नुकसान झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -