Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पुण्यातून जाणाऱ्या पुणे- बंगलोर महामार्गावर नवले पुलाजवळ एका केमिकल टॅंकरचा भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यू झालाय. कालच या ठिकाणी एका ट्रकने धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला होता. महामार्गाच्या सदोष रचनेमुळे हा भाग मृत्यूचा सापळा बनलाय.
पुण्यातील नवले उड्डाणपूल परिसरात ज्वलनशील द्रवपदार्थ वाहून नेणारा टँकर पलटी होऊन भीषण अपघात. यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 गंभीर जखमी झालेत.
अजित पवार त्यांच्या आजच्या नियोजित दौऱ्यातील शेवटचा कार्यक्रम रद्द करून मुंबईला गेले असले तरी शरद पवार मात्र संध्याकाळी बारामतीत मुक्कामाला आलेत. आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या प्रस्तावित मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यासाठी आपण भेटणार असल्याच म्हटले होते.
उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज आणि गुण आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2020 या परिक्षेच्या निकालापासून याची सुरुवात होणार आहे. देशात प्रथमच असा प्रयोग होत असल्यामुळे निकालात पारदर्शकता येणार आहे. गुणपत्रिकेची स्कॅन कॉपी उमेदवारांना उपलब्ध करून दिल्यामुळे उमेदवारांना आपल्याला किती गुण भेटले आहेत हे समजणार आहे
कोरेगाव भीमामधील 1जानेवारी 2018 ला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगाकडून रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंग या दोन पोलीस अधिकाऱ्यांना आठ नोव्हेंबरला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. कोरेगाव भीमाची घटना घडली तेव्हा रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. तर परमबीर सिंग राज्याचे लॉ एन्ड ऑर्डर विभागाचे डी जी होते. त्यामुळे या दोघांची भूमिका जाणून घ्यायची असल्याने दोघांना आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आलय. हे दोघे जर प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत तर त्यांनी लेखी स्वरूपात त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुभाही देण्यात आली आहे.
पुण्यात दोन टोळ्यात भरदिवसा अंधाधुंद गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या गोळीबार एका गुंडासह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एका बॉडीगार्ड जखमी झाला आहे. भरदिवसा हा गोळीबार ऊरूळी कांचन येथील हॉटेलसमोर झाला असून, यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबाराने पुन्हा शहरात टोळीयुद्ध भडकल्याचे पाहिला मिळत आहे. कुविख्यात गुंडाच्या जवळचा साथीदार गुन्हेगारावर हा गोळीबार वाळू व्यावसाय आणि पूर्ववैमन्यासातून झाला असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोणी काळभोर पोलीसांनी धाव घेतली आहे. संतोष संपतराव जगताप यांच्यासह विरूद्ध पार्टीतील एकाचा या गोळीबारत मृत्यू झाला आहे. तर, संतोष जगताप याचा बॉडीगार्ड जखमी झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत आज शिवसेनेनं भाजपचे नेते किरीट सोमैयांचा खोटा चेहरा समोर आणण्यासाठी अनोखं आंदोलन. मुखवटा परिधान करून सोमैयांना आंदोलनात सामील केलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीत 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसं पत्र सोमैयांना लिहीत पुढाकार घेण्याची आणि ईडी-सीबीआयद्वारे चौकशी लावावी अशी मागणी केली. त्याच घोटाळ्याची फाईल आज मुखवटा परिधान केलेल्या सोमैयांच्या हाती सोपविण्यात आली. खऱ्याखुऱ्या सोमैयांनी यावर पलटवार केला असला तरी मुखवटाधारी सोमैय्यानी मात्र ईडी-सीबीआय द्वारे चौकशी करायला लावू. असं आश्वासन दिलं. पण नंतर मुखवटा फाडून हा खोटा सोमैयां असल्याचं म्हणत खरा चेहरा शिवसेनेनं समोर आणला.
पुण्याजवळील उरळी कांचन येथील सोनाई हॉटेल समोर संतोष जगताप या कुख्यात गुंड आवर अज्ञाताने केली फायरिंग. फायरिंग मध्ये संतोष जगताप गंभीर जखमी, घटनास्थळावर लोणी काळभोर पोलिस दाखल, गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट. जखमीला ससून रुग्णालयात हलवले. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, काल शिरूर मधील एका बँकेतून दरोडेखोरांनी 40 लाख रुपये पळवल्याचा घटनेनंतर आज पुन्हा पूर्ववैमनस्यातून गुंडावर फायरिंग.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आले आहेत. मात्र, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत आहे. मंत्री उदय सामंत यांनी यामागचे कारण सांगितले आहे. "कॉलेज सुरू झालेत, परंतु विद्यार्थी संख्या कमी दिसत आहे. विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस घेऊन झाले नाहीत. त्या कारणाने विद्यार्थी संख्या कमी आहे. या पार्श्वभूमीवर मिशन युवा स्थस्थ्य ही विशेष लसीकरण मोहीम 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान राबवणार आहोत. त्याचा लाभ विद्यार्थ्यानी घ्यावा", असेही त्यांनी आवाहन केले आहे.
राज्य शिखर बँकेने राज्यातील वेगवेगळे 30 सहकारी साखर कारखाने विकले. या सर्व कारखान्यांच्या यादिचे वाचन अजित पवार यांनी केलं.
* सहा सहकारी साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँकानी विकले.
* सहा सहकारी साखर कारखाने राज्य सरकारच्या परवानगीने विकण्यात आले.
* तीन सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वतः विकले.
* बारा सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चावण्यास देण्यात आलेत.
गेल्या काही वर्षभरात व्यवहार झालेले अथवा चालवायला दिलेल्या साखर कारखान्याची यादी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. जवळपास हे 64 साखर कारखाने आहेत.
पुण्यातील अल्पवयीन मुलीची झालेली हत्या अतिशय निंदनीय. मात्र या प्रकरणात घरच्यांनी देखील लक्ष देण्याची गरज असते. तो मुलगा नातेवाकच होता आणि त्यांच्या घरीच रहात होता. - अजित पवार
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बॅक दरोड्याच्या प्रकरणात तपास सुरु. बॅकानीही या प्रकरणात सुरक्षेत लक्ष घालण्याची गरज. - अजित पवार
साखर कारखान्याबाबत विविध यंत्रणांनी तपास करुन काहीही उघड झालं नाही. महाराष्ट्रातील साखर कारखानदारीबद्दल खुप बोललं जातंय. कारखान्यांच्या व्यवहारांबद्दल अनेकदा तपास झालाय मात्र अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दिल्या जातायत.- अजित पवार
पुण्यातील जंबो कोविड सेंटर कायम ठेवायचे की काढून टाकायचे याचा निर्णय दिवाळीनंतर घेऊ, असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं
सकाळी कागदपत्रे घेऊन आलोय. पत्रकार परीषदेत अजित पवारांचं मोठं वक्तव्य. साखर कारखान्याबाबत अजित पवार थोड्याच वेळात गौप्यस्फोट करणार
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजाराला जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
पुणे मेट्रोच्या उड्डाणपुलासाठी नागपूर पॅटर्न राबवण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल भविष्यात मेट्रोचे काम झाल्यानंतर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पाडला. अनेक तंत्रांची वापर करण्यात आलाय. हे खरे आहे की नवीन काम करण्याची जबाबदारी असलेल्या टाटा कंपनीला काही अडचणी येतायत. पण दिवाळीनंतर हे काम सुरु करण्यात येईल. - अजित पवार
लस घेतल्यानंतरही काळजी घेणं गरजेचं आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांनी आधिक काळजी घ्यावी. लस घेतल्यानंतर कोरोना होण्याचं प्रमाण ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचं आधिक आहे. - अजित पवार
राज्यात दहा कोटींपेक्षा जास्त लसीकरण झालं. पुण्यात एक कोटी १७ लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे. आधिकारी, लोकप्रतिनिधींचं अजित पवारांनी केलं कौतुक
पहाटे 4 वाजता कोंढवा, टिळेकर नगर, आर के कॉलनी येथे फर्निचरच्या गोडाऊनला आग लागली होती. अरुंद रस्ते व गल्ली यामुळे अग्निशमन दलास पोहोचण्यास अडचणी आल्या. 4 फायरगाड्या व जवान यांनी आग विझवली.
पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजनाला परवानगी, पालकमंत्री अजित पवार यांची माहिती
अजित पवार म्हणाले की, काही लोकांचे प्रयत्न आहेत की बॉलीवूड महाराष्ट्रातून बाहेर घेऊन जायचं. त्यासाठी एका राज्याचे मुख्यमंत्री इथे आले देखील होते. तो त्यांचा अधिकार आहे. पण चित्रपटसृष्टी मुंबईतच राहावी अशी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे आणि महाविकास आघाडी त्याच दिशेने प्रयत्न करेल, असंही पवार म्हणाले.
बालगंधर्व रंगमंदिरात नटराज पुजन झाल्यानंतर रंगमंचावर आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. 'दिवाळीनंतर देखील कोरोना रुगाणांची संख्या अशीच कमी होत राहिली तर नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेची परवानगी देण्यात येईल.
बालगंधर्व रंगमंदिराच्या नूतनीकरणाबाबत मी महापौर आणि आयुक्तांना सुचना देणार आहे. याबाबत दोन मतप्रवाह आहेत. नाट्यगृहाचे नूतनीकरण करताना कलाकारांचा विचार करायला हवा. आधीच दीड वर्षे नाट्यगृहे बंद होती. त्यात नूतनीकरणासाठी पुन्हा बालगंधर्व बंद ठावावे लागल्यास कलाकार आणखी अडचणीत सापडतील.' असं अजित पवार म्हणले.
पार्श्वभूमी
पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्यावर आणि आगाखान पॅलेस येथे भव्य रोषणाई
भारतामध्ये आज शंभर कोटी लसीकरणाचे डोस पूर्ण झाल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा होतोय. याचनिमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्यावर आणि आगाखान पॅलेस येथे भव्य रोषणाई करण्यात आली आहे. शनिवारवाड्यावर रोषणाईच्या माध्यमातून तिरंगा साकारण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारवाडा रोषणाईने उजळून निघाला आहे. कोरोनामुळे बंद असलेला शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस पुन्हा एकदा रोषणाईने उजळून निघालेत. हे क्षण बघण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केलीये.
बॅक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दिवसाढवळ्या दरोडा, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील घटना
पुणे : शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दरोडा पडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरोडेखोरांनी ओळख लपवण्यासाठी कानटोप्या घातल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरोडेखोरांनी लुटीसाठी वापरलेल्या गाडीवर प्रेस असं लिहिल्याचंही काहींनी सांगितलं. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असून पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख पिंपरखेडकडे रवाना झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -