Pune News LIVE Updates : पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्यावर आणि आगाखान पॅलेस येथे भव्य रोषणाई
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
भारतामध्ये आज शंभर कोटी लसीकरणाचे डोस पूर्ण झाल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा होतोय. याचनिमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्यावर आणि आगाखान पॅलेस येथे भव्य रोषणाई करण्यात आली आहे. शनिवारवाड्यावर रोषणाईच्या माध्यमातून तिरंगा साकारण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारवाडा रोषणाईने उजळून निघाला आहे. कोरोनामुळे बंद असलेला शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस पुन्हा एकदा रोषणाईने उजळून निघालेत. हे क्षण बघण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केलीये.
भारतात आज शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण होतोय त्यामुळे लसीकरण केंद्रावर उत्साहाचा आनंदाचा वातावरण पाहायला मिळतोय. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल लसीकरण केंद्र येथे आज रांगोळी काढण्यात आली. केक कापण्यात आला तर डॉक्टर, नर्स यांना गुलाबाची फुलं देऊन सन्मानित करण्यात आलं. पुणे शहरात ही आज 50 लाखाचा लसीकरणाचा टप्पा पार झाला आहे. आजही या लसीकरण केंद्रावर मोठ्या संख्येने लोक लस घेण्यासाठी आली होती. त्यांचाही स्वागत या ठिकाणी केले जात होते
पुणे : शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दरोडा पडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरोडेखोरांनी ओळख लपवण्यासाठी कानटोप्या घातल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरोडेखोरांनी लुटीसाठी वापरलेल्या गाडीवर प्रेस असं लिहिल्याचंही काहींनी सांगितलं. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असून पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख पिंपरखेडकडे रवाना झाले आहेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फ्लेक्स काढून टाकण्याची वेळ राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकावर आली आहे. पुण्यातील कात्रज आणि धनकवडी भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हातात तलवार घेतलेले आणि समझदार को ईशारा काफी है असं वाक्य लिहिलेला फ्लेक्स पुण्यात चर्चेचा विषय बनला होते. अजित पवारांशी संबंधित गेल्या कही दिवसांमधे घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या फ्लेक्सकडे पाहिलं जात होतं. पण राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या वादग्रस्त फ्लेक्सची दखल घेऊन नगरसेवक युवराज बेलसरे यांना हे फ्लेक्स काढून टाकण्यास सांगण्यात आलय.
येरवड्यात दहशत माजवण्यासाठी पाच जणांच्या टोळक्याने हातात तलवारी घेत दुकानाची तोडफोड केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेले आहे. याच टोळक्याने दुसऱ्या एका दुकानात दरोडा टाकत परिसरात दहशत माजवून गोंधळ घातला. या टोळक्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. येरवड्यातील जयप्रकाशनगर भागात जनरल स्टोअरमध्ये हा सर्व प्रकार घडला. आरोपी निखिल मिसाळ, त्याचे दोन अल्पवयीन साथीदार आणि इतर दोघे जण हातात तलवारी, बांबू घेऊन परिसरात आले. त्यांनी दहशत माजवण्यासाठी दुकानाची तोडफोड केली. दुकान बंद करण्यासाठी धमकावले आणि जातेवेळी शेजारी असणाऱ्या एका दुकानामधून 5 ते 6 हजार रुपयांची रोकड चोरली. या घटनेनंतर या परिसरात लोकांमध्ये भीतीच वातावरण आहे.
पार्श्वभूमी
Ajit Pawar : लोणावळा बकाल करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दम
Ajit Pawar On Lonavala : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या विधानमुळे आणि रोखठोक स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. अजित पवार यांच्या याच स्वभावाची प्रचिती आज आली. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत लोणावळा बकाल करणाऱ्यांना दम भरला असून सर्वांना नियम सारखे असल्याचा इशाराही दिला. ते पर्यटन विकासावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी लोणावळ्यातील परिस्थितीवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले की, 'पर्यटन विकास हे खर्चिक काम आहे, पण करायचं आहेच. लोणावळाकरांनो आपलं शहर चांगलं दिसेल, बकालपणा येणार नाही. लोकांना त्रास होणार नाही. गुंड, दहशत, दादागिरी होणार नाही. कायदा सुव्यवस्था चोख असेल. याची काळजी पालकमंत्री म्हणून मला, खासदार-आमदारांना, लोकप्रतिनिधी आणि पोलिसांना देखील घ्यावी लागेल. त्याबद्दल कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, कायदा हातात घेऊ नका. सर्वांना नियम सारखे आहेत.'
Pune Corona Update : पुणेकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी; आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
Pune Corona Update : पुणेकरांसाठी सर्वात आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल आठ महिन्यानंतर म्हणजेच 6 फेब्रुवारी 2021 नंतर पहिल्यांदाच पुण्यात कोरोनामुळे एकाही मृताची नोंद नाही. पुणे शहर आणि ग्रामिण दोन्हीमध्ये आज, कोरोनामुळे एकाही मृताची नोंद नाही. दिवसभरात पुण्यात 112 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 118 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यातील एकूण पॉजिटिव्ह कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 503469 इतकी झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 988 इतकी झाली आहे. पुण्यातील मृताची संख्या 9067 इतकी झाली आहे. आतापर्यंत 493414 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पुणे शहरात आज 5986 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Pune Crime : शॉर्टफिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून 31 वर्षीय महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल
पुणे- चित्रपटसृष्टी हा अनेकांचा आकर्षणाचा विषय आहे. या सृष्टीला असणाऱ्या ग्लॅमरमुळे अनेक जण यावर भाळतात. चित्रपट क्षेत्रामध्ये काहीजण यशस्वी होतात. तर अनेक जण अपयशी ठरतात. वरून ग्लॅमरस दिसणाऱ्या या चित्रपटसृष्टीची दुसरी बाजू ही वेगळी आहे. त्यामुळे अनेकांचे जीवन उद्धवस्त झाल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या शॉर्टफिल्ममध्ये काम करण्याची इच्छा अनेकांची असते. पण या इच्छेचा अनेक जण गैरवापर करू शकतात. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका 31 वर्षीय विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -