Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 20 Oct 2021 07:50 AM
म्हणून अजित पवार विनामास्क भाषणाला उभे राहिले, अन दादांना त्यांच्याच शब्दाचा विसर पडला

अजित दादा सगळे हट्ट पुरवले आता एकच हट्ट पुरवा, फक्त मास्क काढून बोला. अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळकेंनी केली आणि अजित पवार मास्क काढून भाषणाला उभे राहिले. पण दुपारी लोणावळ्यात मी फक्त जेवण करताना, पाणी पिताना आणि रात्री झोपताना मास्क काढतो. असं म्हणणाऱ्या अजित पवारांना मात्र त्या वक्तव्याचा विसर पडला.

राज्य सरकारच्या विरोधात पुण्यातदेखील आंदोलन

राज्य सरकारच्या विरोधात राज्यभरात आजपासुन विविध मागण्याकरता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन सुरु करण्यात येत आहे. पुण्यातही स्टेशन परिसरातील आंबेडकर उदयानासमोर आंदोलन करण्यात आले आहे.ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये राज्य शासनाच्या वतीने मदत देण्यात यावी.पिडीत बलत्कारित महिलांना पन्नास लाख रुपये राज्य शासनाच्या वतीने मदत देण्यात यावी.ऍट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. ओबीसी समाजाला राज्यामध्ये राजकीय आरक्षण देण्यात यावे. महात्मा फुले,आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देण्यात यावा.रेशनिंगवर देण्यात येत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याची चौकशी करण्यात यावी. अनुसूचित जाती-जमातीचा पदोन्नतीतील अनुशेष त्वरित भरण्यात यावा.अशा मागण्याकरता हे आंदोलन करण्यात आले. 

पुण्याच्या मावळ तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज दौरा

पुण्याच्या मावळ तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज दौरा सुरु आहे. ठिकठिकाणी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण होत आहे. मावळचे आमदार सुनील शेळकेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून 31 वर्षीय विवाहितेवर बलात्कार
Pune News : शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका 31 वर्षीय विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर बाळू निकम (वय 31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 21 वर्षाच्या विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. ऑक्टोबर 2017 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत फिर्यादीच्या घरी आणि कोण हा परिसर आता प्रकार सुरु होता. पुण्यामध्ये सातत्याने अशा प्रकारच्या घटना समोर येताना दिसत आहेत. आणि त्याचबरोबर गुन्हेगारी देखील वाढताना दिसत आहे.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी समीर हा शॉर्टफिल्म बनवतो. त्याने काही गाणी देखील तयार केली आहे. शॉर्ट फिल्म मध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने विवाहित महिलेशी ओळख वाढवली. त्यांना फिल्म इंडस्ट्रीत स्थायिक करण्याचे आमिष दाखवले..या बहाण्याने त्याने पीडित विवाहितेसोबत वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
Pune News : मलेरियावर लस शोधल्यानंतर आता वैज्ञानिकांना डेंग्यूवर देखील औषध

Pune News : मलेरियावर लस शोधल्यानंतर आता वैज्ञानिकांना डेंग्यूवर देखील औषध शोधण्यात यश आलं आहे. लवकरच या औषधांची रुग्णांवर चाचणी होणार आहे. देशभरातल्या 20 केंद्रांमध्ये जवळपास 10 हजार रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात येणार आहे. ज्यात मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद या केंद्रांचा समावेश आहे. 

22 ऑक्टोबरपासून नाट्यगृहात तिसरी घंटा खणखणार; नाट्यरसिकांमध्ये आनंदाचं वातावरण

Pune News : नाट्यगृहातील पडदा उघडण्यास अखेर सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळे 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृहात तिसरी घंटा खणखणेल आणि नाट्यरसिक नाटकांचा मनमुराद आनंद घेऊ शकतील. या पार्श्वभूमीवर नाट्यगृहांमध्ये तयारीला वेग आलाय. स्वच्छता, साफसफाई, रंगरगोटी आणि सॅनिटायझेशन करण्याचा तयारी सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमधील नाट्यगृह प्रेक्षकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून बंद असलेले नाट्यगृह सुरु होत असल्यानं कलाकार आणि प्रत्यक्ष नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी आसूलेले प्रेक्षकांना आनंदाचं वातावरण आहे.

पार्श्वभूमी

खुशखबर... दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाची 3 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी; नामांकित बिल्डर्सच्या प्रकल्पातील घरांचाही समावेश


Pune Mhada Lottery :  पुणे आणि परिसरात घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. मुंबई आणि परिसरानंतर बहुतांश लोकांचा कल हा पुण्यात घर घेण्याचा असतो. दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाच्या (Mhada) वतीनं तब्बल 3 हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या घरांमध्ये जवळपास दीड हजार घरं 20 टक्क्यातील आणि नामांकित, मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.


गेल्या एक - दीड वर्षांत आठ हजार घरांची सोडत काढण्यात आली होती. अशातच एका वर्षांत घरांच्या लॉटरीची 'हॅटट्रिक' करत  पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी आणखी एक विक्रम केला आहे. कोरोनाता प्रादुर्भाव आणि त्यामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन यांमुळे अनेकांची आर्थिक बाजू कोलमडली आहे. अशातच गरिब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला आहे. याआधी कोरोनापूर्वी जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीनं आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी म्हणजेच, 5 हजार 657 घरांची सोडत काढण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही घरांची लॉटरी काढण्यात आली होती.  म्हाडाच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही सर्वसामान्यांसाठी घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती. यावेळी पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत म्हाडाने काढली होती. अशातच आता दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडा आणखी तीन हजार पेक्षा अधिक घरांसाठी लॉटरी काढत आहे. यामध्ये दीड हजार घरं वीस टक्क्यातील आणि सर्व नामांकित, मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती नितीन माने पाटील यांनी दिली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.