Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Oct 2021 10:16 AM
कोरोनाच्या रुग्णांना आता पाठीच्या मनक्याला बुरशीचा संसर्ग होत असल्याचं समोर, पुण्यात पाच रुग्णांची नोंद

कोरोनाच्या रुग्णांना आता पाठीच्या मनक्याला बुरशीचा संसर्ग होत असल्याचं समोर आलंय.  पुण्यात अशा पाच रुग्णांची नोंद झालीय.  पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या पाठीला बुरशीचा संसर्ग झाल्याच दिसून आल्यावर डॉक्टरांनी त्यांची मेडिकल हिस्ट्री तपासली असता पाचही जणांन काही दिवसांपूर्वीच कोरोना झाल्याच समोर आलं.  ज्या प्रकारच्या बुरशीचा संसर्ग या रुग्णांना झालाय ती बुरशी या आधी वेगवेगळ्या कारणांनी रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेल्या रुग्णांमधेआढळत होती. पण कोरोनाच्या रुग्णांमधे ती फहिल्यांदाच आढळलीय. म्युकरमायकोसीस पेक्षा ही बुरशी वेगळी असुन लक्षण आढळल्यास कोरोना रुग्णांनी लगेच रुग्णालयात दाखल व्हावं असं मंगेशकर हॉस्पिटलचे इनफेक्शीयस डीसीज एक्सपर्ट डॉक्टर परिक्षित प्रयाग यांनी म्हटलय. 

Drug Case : एनसीबी कारवाई वेळी उपस्थित असलेल्या किरण गोसावींचा शोध सुरु, पुणे पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी

Pune Crime : क्रुझवर एनसीबी ने केलेल्या कारवाई वेळी पंच म्हणून उपस्थित असलेल्या किरण गोसावींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीसांनी लुकआऊट नोटीस जारी केलीय. त्याचबरोबर किरण गोसावींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक पुणे पोलिसांकडून करण्यात आलीय. किरण गोसावीवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची फसवणूक केल्याबद्दल 2018 साली गुन्हा नोंद झालाय. तेव्हापासून तो पुणे पोलीसांना सापडलेला नाही.

पुणे आणि नाशिकहून दररोज मुंबईचा प्रवास करणा-या चाकरमान्यांचे हाल कधी संपणार?

Pune Updates : पुणे आणि नाशकातून दररोज मुंबईचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल कधी संपणार? असा सवाल उपस्थित होतोय. कारण मध्य रेल्वेनं पास देण्याची तयारी दाखवली पण राज्य सरकारची परवानगी नसल्यानं पास देता येत नसल्याचं मुंबई हायकोर्टात स्पष्ट केलंय. यावर मुंबई उच्च न्यायालयानं 25 ऑक्टोबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत. पुणे, नाशिकहून नागरिक रोज पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी, लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेसनं प्रवास करतात. पण मासिक पास मिळत नसल्यानं त्यांना रोजचा प्रवास करणं कठीण जात आहे. ((लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पुणे ते मुंबई आणि मुंबई ते नाशिक असा रेल्वे पास दिला जात नसल्यानं)) याबाबतच रेल्वे प्रवासी संघटनेनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. ((त्यात प्रवाशांना मासिक पास दिला जात नसल्यानं मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्याचीच दखल घेत )) त्यावर मध्य रेल्वे या प्रवाशांना पास का देत नाही, अशी विचारणा हायकोर्टानं केल्यावर मध्य रेल्वेनं त्याचं खापर राज्य सरकारवर फोडलंय.

पार्श्वभूमी

पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन 27 फेब्रुवारी रोजी रंगणार, 15 ऑक्टोबरपासून ऑनलाइन नाव नोंदणीला सुरुवात


यंदाची 35 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 27 फेब्रुवारी 2022 रोजी रंगणार आहे. देशातील मॅरेथॉन शर्यतीची जननी असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या आयोजनात कोविडमुळे खंड पडला होता. क्रीडाक्षेत्र ठप्प पडले असल्याने 2020 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होऊ शकली नव्हती. 


सध्या कोविडची साथ ओसरत आहे. तरीदेखील स्पर्धकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करण्याच्या प्रतिबद्धतेमुळे नेहमीप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारऐवजी पुढील वर्षी 27 फेब्रुवारी रोजी ही शर्यत आयोजित करण्यात येत आहे. पुणे महापालिकेशी योग्य तो समन्वय साधून तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड सुरक्षेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करून ही शर्यत होईल, असे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष  अॅड. अभय छाजेड यांनी सांगितले.


या शर्यतीसाठी 15 ऑक्टोबरपासून ऑनलाइन नाव नोंदणीला सुरुवात होईल असं सांगून रेस डायरेक्टर सुमंत वाईकर म्हणाले की, "शर्यतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी www.marathonpune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे शर्यतीसंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध असेल. 31 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करता येईल. 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक अर्ली बर्ड डिस्काउंट देण्यात येईल. याबाबतची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल."


पुण्यात 14 वर्षीय मुलीची एकतर्फी प्रेम प्रकरणातून तब्बल 44 वार करून निर्घृण हत्या


पुण्यातील बिबवेवाडी परीसरात एका 14 वर्षीय मुलीची एकतर्फी प्रेम प्रकरणातून धारधार कोयत्याने तब्बल 44 वार करून निर्घृण हत्या करण्यात आलीय. ही घटना बिबवेवाडी परीसरात असलेला यश लॉन्स येथे घडलीय. पोलिसांनी या प्रकरणात ऋषिकेश भागवत या 22 वर्षांच्या तरुणाला अटक केली असुन हत्येसठी त्याला मदत करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 


यातील मुख्य आरोपी हा मृत मुलीचा चुलत मावस भाऊ असुन गेल्या काही काळापासून तो तिला त्रास देत होता. मात्र, मुलीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा राग त्याच्या मनात होता. या रागातुन त्याने थंड डोक्याने सदर मुलीची हत्या करण्याचा कट रचला. सदर मुलगी आठवीत शिकत होती आणि स्थानिक कबड्डी संघाची ती खेळाडूही होती. ती दररोज संध्याकाळी कबड्डीच्या सरावासाठी यश लॉन्स या मैदानावर जायची. आरोपी ऋषिकेश भागवतने तिच्यावर पाळत ठेवून ती कबड्डी खेळायला किती वाजता येते याची माहिती काढली. हत्येच्या आधी काही दिवस हेल्मेट घालून तो मैदानावर गेला आणि त्याने हत्येची रेकी देखील केली. त्यानंतर त्याने धारदार शस्त्रे जमवायला सुरुवात केली. हत्यारे जमल्यावर तो मंगळवारी संध्याकाळी त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांसह मैदानावर पोहचला आणि संधी साधून त्याने अचानक मुलीवर हल्ला चढवला.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.