Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 19 Nov 2021 10:04 AM
पुण्यात गेल्या 24 तासात 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 81 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 81 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 495923 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात तीन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 849 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4719 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडारेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडारेशन ऑफ इंडियाच्या गोवा येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून फेडरेशनच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते टी. पी. अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.  फिल्म फेडारेशन ऑफ इंडिया ही देशभरातील प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. आज गोवा येथे देशभरातील विविध संघटनांच्या अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मेघराज राजेभोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट ही देशातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेली  प्रमुख संस्था आहे. राजेभोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शिरपेचात मानात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

आजपासून पुण्यात 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी चाचणी स्पर्धेला सुरुवात

आजपासून पुण्यात 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी चाचणी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पुण्यातील लोहगावमधे ही चाचणी स्पर्धा होत आहे.  या चाचणी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या पैलवानांना महाराष्ट्र केसरीच्या मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे.  कोरोनामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुढे ढकलावी लागली होती. आता स्पर्धेला परवानगी मिळाल्यावर पैलवानांनी तयारी सुरु केली. पुणे जिल्ह्यासाठीच्या या चाचणी स्पर्धेत 250 पैलवान सहभागी झालेत. दोन दिवस ही चाचणी स्पर्धा चालणार आहे. 

पार्श्वभूमी

रिक्षा भाडेवाढीनंतर पुणेकरांना दुसरा झटका, सीएनजी दरात 1 रुपया 80 पैशांची वाढ


रिक्षा भाडेवाढीनंतर (Pune Auto Rickshaw fare hike) आता पुणेकरांवर नवं संकट ओढवलंय.  इंधन दरवाढ  (Petrol Price Hike)झालेली नसली तरी पुण्यात सीएनजी दरात प्रतिकिलोमागे  1 रुपया  80 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे पुणेकरांना एक किलो सीएनजीसाठी 63.90 रु. मोजावे लागणार आहेत. पुण्यात सीएनजीच्या किमतीत प्रती किलो 1 रुपये 80 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. याचा पुणेकरांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता पुण्यातील सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यातही वाढ होऊ शकते.


त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.


  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त संपूर्ण मंदिर परिसरात दिवे लावण्यात आले असून या दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला. गणपती मंदिर परिसरात होत असलेला हा दीपोत्सव पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तर दुसरीकडे सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात 11000 दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा केला गेला.



देहूरोडमधील एका बुलेटस्वाराच्या गाडीतून चोरट्याने केले बाटली भरून पेट्रोल लंपास



पेट्रोलचे दर शंभरी पार झाल्यापासून दुचाकीस्वार हैराण झालेत. यातूनच पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढू लागलंय. अशीच एक चोरी सीसीटीव्हीत देखील कैद झालीये. देहूरोडमधील एका बुलेटस्वाराच्या गाडीतून चोरट्याने बाटली भरून पेट्रोल लंपास केलं. अनेकदा असा प्रकार त्याच्यासोबत घडत होता, म्हणूनच त्याने सीसीटीव्ही रिसिव्हर तपासलं. तेंव्हा पेट्रोल चोरी होत असल्याचं निष्पन्न झालं. एकतर प्रति किलोमीटर त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागतायेत अन दुसरीकडे पेट्रोल चोरट्यांनी डोकेदुखी वाढवली आहे.



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.