Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 12 Nov 2021 07:29 AM
पुण्यात गेल्या 24 तासात 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 67 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 67 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 495323 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 760 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 5371 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

किरण गोसावीला पिंपरी चिंचवड पोलीस अटक करणार

किरण गोसावीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलीस ही त्याला अटक करणार आहेत. कारण भोसरी पोलीस स्टेशनमध्ये किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. विजयकुमार कानडे यांनी तशी फिर्याद दिली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या विजयकुमारला मार्च 2015 मध्ये एक मेल आला. शिवा इंटरनॅशनलने पाठविलेल्या या मेल मध्ये परदेशात हॉटेल मॅनेजमेंटच्या नोकरीची ऑफर होती. विजयने या मेलवर बायोडाटा पाठविला. तेंव्हा किरण गोसावीने विश्वास संपादन करत ब्रुनेईत नोकरी लावतो असं त्याला आश्वासन दिलं. पण यासाठी काही रक्कम खर्च करावी लागेल असं त्याने सांगितलं. त्यानुसार किरण गोसावी पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाटा येथे विजयला भेटला. तिथं त्याने तीस हजारांची रोकड घेतली. नंतर ठाण्यातील घोडबंदर मधील शिवा इंटरनॅशनलच्या कार्यालयात जाऊन रोख रक्कम आणि ऑनलाइन पद्धतीने पैसे दिले. नोकरीच्या आमिषापोटी विजयने तब्बल सव्वा दोन लाख रुपये मोजले. पण किरणने नोकरी ही मिळवून दिली नाही आणि रक्कम ही परत केली नाही. असा आरोप विजयने ठेवत, भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय. किरण गोसावी सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत आहे. त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलीस ही त्याला याप्रकरणात अटक करणार आहे.

पार्श्वभूमी

किरण गोसावीला सहा दिवसांची पोलिस कोठडी



किरण गोसावीला सहा दिवसांची पोलिस कोठडी. लष्कर पोलीसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात किरण गोसावीचा ताबा घेऊन त्याला आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. किरण गोसावीवर पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशन प्रमाणेच लष्कर आणि वानवडी पोलीस स्टेशनमध्ये ही गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत. फरासाना पोलीसांनंतर लष्कर पोलीसांनी गोसावीचा ताब्यात घेतले.


मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत कारभार पाहणाऱ्या मंत्र्याला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत: उल्हास बापट



उल्हास बापट- 
* मुख्यमंत्री अनुपस्थित असतील तर राज्याचा कारभार कोणी पहायचा याबाबत घटनेत स्पष्ट अशी कोणतीही तरतुद नाही. 
* आपल्या लोकशाहीला इंग्लंडचा वारसा असल्याने तिकडे काय होते याचा आपल्याकडे निर्णय घेताना विचार होतो. 
* आपल्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची घटनेत तरतुद नाही.  त्यामुळे मुख्यमंत्र्यांनंतर सगळे मंत्री समकक्ष ठरतात. 
* आपल्या अनुपस्थितीत आपले अधिकार कोणाला द्यायचे हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांवर अवलंबून असते.  ते उपमुख्यमंत्र्यांकडेच द्यायला हवेत असं बंधन नाही. 
* मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत कारभार पाहणाऱ्या मंत्र्याला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत.  रोजचे कमकाज मात्र चालू राहील.


अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर



अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याच नक्की झाला आहे.  या दौऱ्यात पुण्यातील वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेशन या संस्थेत अमित शहांकच्या उपस्थितीत सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आलय. या कार्यक्रमानंतर अमित शहा पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचीही शक्यता आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रमुख या नात्याने शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अमित शहांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याच आमंत्रण दिले आहे. केंद्र सरकारकडून सहकार मंत्रालय स्थापन करुन त्याची जबाबदारी अमित शहांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.  त्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या या पुणे दौऱ्याकडे सहकार क्षेत्राकडून उत्सुकतेनं बघितले जाणार आहे.




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.