एक्स्प्लोर

Pune News : धक्कादायक! भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने गळफास घेत संपवलं आयुष्य

Pune News: संजय बराटे यांचे वारजे एनडीए रोडवर (Warje NDA Road) घर आहे. त्याच इमारतीमध्येच त्यांचे कार्यालय आहे. बराटे हे शुक्रवारी आपल्या कार्यालयात होते.

Pune Suicide : भाजपच्या माजी  (Suicide)पदाधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. वारजे येथील त्यांनी आपल्याच कार्यालयात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संजय ज्ञानोबा बराटे असं या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव होतं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बराटे यांचे वारजे एनडीए रोडवर (Warje NDA Road) घर आहे. त्याच इमारतीमध्येच त्यांचे कार्यालय आहे. बराटे हे शुक्रवारी आपल्या कार्यालयात होते. त्यांची पत्नी शुक्रवारी सायंकाळी कार्यालयात गेल्या. तेव्हा संजय बराटे यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. कार्यालयात पोलिसांनी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. वारजे पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीनं केली होती आत्महत्या

यापूर्वी पुण्यात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या काही नेत्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात मनसेतून शिंदे गटात दमदार एन्ट्री घेतलेले नेते निलेश माझिरे (Nilesh Majhire) यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केली होती. विष प्राशन करुन त्यांच्या पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याने सगळीकडे खळबळ उडाली होती. पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.   राहत्या घरात पत्नीने विष प्राशन केलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निलेश माझिरे यांनी मनसेतून शिंदे गटात प्रवेश घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांनी शिंदे गटात एन्ट्री घेतली होती. 

आत्महत्येत वाढ झाल्याचं घटनांमधून समोर 

पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील इतर शहरात आत्महत्येत वाढ झाली आहे. सर्व क्षेत्रास सुरु असलेली स्पर्धा यासाठी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. मात्र या आत्महत्येमागची कारणंदेखील क्षुल्लक असल्याचं आतापर्यंतच्या घटनेतून समोर आलं आहे. त्यात जर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी किंवा राजकीय कार्य करत असलेल्या नेत्याने आत्महत्या केली तर अनेक प्रश्नांना तोंड फुटतं. त्याच कोणाशी काही वादावादी झाली का? किंवा आत्महत्या नसून घातपात आहे का?, असे प्रश्न उपस्थित केले जातात. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्याने कार्यलयातच गळफास घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Moshi Building Collapsed : मोशी दुर्घटनेप्रकरणी कुलकर्णी-आल्हाटचे निलंबन, पण आयुक्तांचं गुन्ह्यापासून अभय!
मोशी दुर्घटनेप्रकरणी कुलकर्णी-आल्हाटचे निलंबन, पण आयुक्तांचं गुन्ह्यापासून अभय!
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Pune Crime Nilesh Ghaywal gang: पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
ATS Action In Pune: पुण्यातील 60 जणांच्या घरावर ATS चे एकाचवेळी छापे; 51 जणांची चौकशी, धाड टाकताच काय काय सापडलं?
पुण्यातील 60 जणांच्या घरावर ATS चे एकाचवेळी छापे; 51 जणांची चौकशी, धाड टाकताच काय काय सापडलं?

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget