पुणे:  संपूर्ण राज्यासह पुण्यातील (Pune) खड्यांमुळं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं जीव मुठीत घेऊन चालकांना वाहनं चालवावी लागत आहेत.  पुण्याच्या रस्त्यातील खड्ड्याने तरुणाचा जीव घेतला. पालकाने न्यायालयात दाद मागितली. अखेर आपला एकुलता एक मुलगा गमावलेल्या दिनेश सोनी यांना तब्बल 16 वर्ष न्यायालयाचा लढा दिला. अखेर त्यांनी ही लढाई जिंकली असून त्याची चर्चा सध्या सर्व माध्यमांमध्ये होताना दिसत आहे. 


पुण्याच्या रस्त्यातील खड्ड्याने दिनेश सोनी यांच्या एकुलत्या एका मुलाचा जीव घेतला. दिनेश सोनी यांनी  न्यायालयात दाद मागितली. खड्ड्यामुळे झालेल्या अपघातास महापालिकेला जबाबदार धरून पुणे दिवाणी न्यायालयाने 16 लाख 35 हजार  रुपयांची नुकसानभरपाई पालकांना देण्याचा आदेश दिला आहे.


 विशेष म्हणजे शिवाजीनगर न्यायालयाच्या समोरच हा खड्डा होता  शिवाजीनगर न्यायालयासमोरच्या  एका खड्ड्याने 26 जून 2006 रोजी मूळच्या औरंगाबादमध्ये असलेल्या यश सोनी याचा जीव घेतला. 
 मुलगा यश  हा पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात छायाचित्राचे प्रशिक्षण घेत होता. 26 जून 2006 रोजी तो मोटारसायकलवरून संचेती हॉस्पिटल चौकाकडून जात असताना शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर एक मोठा खड्डा चुकवताना त्याचा तोल गेला. त्यामुळे त्याची मोटारसायकल फरपटत गेली. पुढे दुभाजकाबाहेर आलेला अर्धवट कापलेला लोखंडी रॉड त्याच्या छातीत घुसला. रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.


आपल्या मुलाचा अपघात रस्त्यावरील खड्डा आणि दुभाजकाच्या कापलेल्या रॉडमुळे झाला असून महापालिकेला त्याबद्दल भरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी याचिका सोनी  यांनी न्यायालयात दाखल केली. न्यायालयाने या अपघातास महापालिकाच जबाबदार असून, 16 टक्के वार्षिक व्याजासह 16 लाख रुपये नुकसान भरपाई सानी यांना द्यावी, असे आदेश दिले.  आपला एकुलता एक मुलगा गमावल्याने दिनेश सोनी यांनी तब्बल 16 वर्ष न्यायालयाचा लढा लढला त्यावेळी त्यांना हा न्याय मिळाला. 


गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे अपघात आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे.


संबंधित बातम्या :


 मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका सज्ज, 15 दिवसात कार्यादेश जारी करणार; आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती