Pune Navale Bridge Accident: नवले ब्रीजवर केवळ सांगाडे उरले; पुण्यातील थरारक घटना, अपघाताचं कारणही आलं समोर, नेमकं काय घडलेलं?
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावर काल संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला होता.

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावर काल (13 नोव्हेंबर) संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात (Navale Bridge Accident) झाला होता. एका ट्रकने 20 ते 25 वाहनांना धडक दिली. ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात झाला. अपघातानंतर लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. तसेच मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली. कार पुढे उभ्या दुसऱ्या कंटेनरमध्ये कार अडकली आणि तिने पेट घेतली. आगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून (Pune Navale Bridge Accident) खाक झाला. कारमधील दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. कंटेनर चालक आणि त्याचा क्लीनर यांचादेखील आगीत होरपळून मृत्यू झाला. पाच ते सात मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होताच, त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत वाहनांचे केवळ सांगाडेच उरले होते.
नेमकं काय घडलं, अपघाताचं कारण काय? (Navale Bridge Accident)
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर एका ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि या ट्रकने 20 ते 25 वाहनांना धडक दिली. पुढे ट्रकने एका कारला धडक दिल्यानं ही कार धडक देणारा ट्रक आणि रस्त्यावरील आणखी एका ट्रकच्या मध्ये अडकली. त्याचवेळी आगीचा भडका उडाला. या घटनेनंतर पुण्यातील नवले पुलावर होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची आता नावही समोर आली आहेत.
पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात झालेल्या मृतांची आणि जखमींची नावं- (Pune Navale Bridge Accident)
पल्स हॉस्पिटल येथील रुग्णांची माहिती-
मयत व्यक्तींची नावं
1) कारमधील प्रवासी मयत
स्वाती संतोष नवलकर, वय 37 वर्ष
ओळखणारे संतोष नामदेव नवलकर राहणार विश्वास पॅलेस धायरी फाटा पुणे यांची पत्नी
2) कारमधील प्रवासी मयत
शांता दत्तात्रय दाभाडे वय 54 वर्ष
ओळखणारे संतोष नवलकर यांची सासू
3) कारमधील प्रवासी मयत
दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे वय 58 वर्षे राहणार सत्यसाई अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 10, धायरी फाटा पुणे
ओळखणारे संतोष नवलकर यांचे सासरे
4) मोक्षिता हेमकुमार रेड्डी वय 03 वर्ष B 301, पॅराडाईज वन, स्वराज कॅपिटल जवळ, लक्ष्मी चौक, चिखली पुणे
ओळखणारे वडील हेमकुमार रेड्डी
5) ( कारचालक ) मयत
धनंजय कुमार कोळी वय तीस वर्ष राहणार सोनवणे वस्ती चिखली पुणे मुळगाव जयसिंगपूर कोल्हापूर
ओळखणारे महेश दुन्दप्पा गोणी भाऊजी
6) मयत सिल्वर बर्च हॉस्पिटल: रोहित ज्ञानेश्वर कदम वय 25 वर्ष राहणार लोणी तालुका खंडाळा जिल्हा सातारा.
ट्रकमधील मरण पावलेल्या दोघांची ओळख पटलेली नाही. असे एकुण 8 मृत्यु आहेत.
नवले हॉस्पिटल येथील जखमी रुग्णांबाबत माहिती- (Pune Navale Bridge Accident)
1. सय्यद शालीमा सय्यद
2. जुलेखा अमजद सय्यद वय 32 वर्ष
3. अमजद सय्यद वय 40 वर्ष . सर्व राहणार भक्ती शक्ती रोड, निगडी पुणे
4. सतीश वाघमारे वय 35 वर्ष, राहणार शिरूर खांदाड नांदेड
5. सोहेल रमनुद्दीन सय्यद वय 20 वर्ष राहणार निकोडो चाकण पुणे मो क्र 9604752133
6. शामराव पोटे वय 79 वर्ष राहणार हिंजवडी पुणे
अडवांटेज हॉस्पिटल मार्केट यार्ड
1. अंकित सालीयन वय 30 वर्ष राहणार तारा वेस्ट आंबेगाव बुद्रुक पुणे
























