एक्स्प्लोर
पुण्यात दुकानातून साड्या चोरणाऱ्या मायलेकी रंगेहाथ अटकेत
या मायलेकी एका राजकीय पक्षाशी निगडित असल्याची माहिती आहे, मात्र पोलिसांना याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

पिंपरी चिंचवड : दिवाळीच्या गर्दीची संधी साधत साड्यांवर हात करणाऱ्या मायलेकींना दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. पुण्यातल्या तळेगावमधील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या मायलेकी एका राजकीय पक्षाशी निगडित असल्याची माहिती आहे, मात्र पोलिसांना याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. विशेष म्हणजे साड्या चोरणारी आरोपी लेक अल्पवयीन आहे. मायलेकींनी एक-दोन नव्हे तर दहापेक्षा अधिक महागड्या साड्या लंपास केल्या होत्या. दोघी जणी एक-एक साडी दुकानाबाहेर उभ्या असलेल्या चारचाकीत ठेवत असताना त्यांचा हा डाव दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. रंगेहाथ पकडल्या गेल्यामुळे त्यांचं बिंग फुटलं. इज्जतीचा पंचनामा होऊ नये म्हणून साड्या परत देऊन पैसेही देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. पण तळेगाव पोलिसांत दुकान मालक रुपेश मेहता यांनी गुन्हा दाखल केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
निवडणूक
महाराष्ट्र
भारत























