एक्स्प्लोर

Pune Metro: गणेशोत्सवात पुणेकरांच्या सेवेत असणार मेट्रो... वेळा अन् फेऱ्याही वाढवल्या; मध्यरात्री पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय

Ganeshotsav 2024 Pune Metro: गणेशोत्सव कालावधीत मेट्रोच्या फेऱ्या व वेळेतही वाढ केली असल्याची माहिती आहे. तर गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रो दिवस-रात्र धावणार असल्याची माहिती आहे.

पुणे : आज राज्यभरात गणेशोत्सवाचा सोहळा पाहायला मिळत आहे. घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे, गणेशोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक मोठमोठ्या शहरांमध्ये येत असतात. त्याच्यासाठी ज्यादा बस, पोलिस सुरक्षा आदीची मोठी तयारी मोठ्या शहरांमध्ये केली जाते, अशातच पुण्यातील गणेशोत्सवात मेट्रोदेखील (Pune Metro) गणेशभक्तांच्या सेवेत तैनात असणार आहे. महामेट्रोने या गणेशोत्सव कालावधीत मेट्रोच्या फेऱ्या व वेळेतही वाढ केली असल्याची माहिती आहे. तर गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रो (Pune Metro) दिवस-रात्र धावणार असल्याची माहिती आहे.

पुणे मेट्रो प्रशासनाने वेळ आणि फेऱ्या वाढवल्या

पुणे महामेट्रो (Pune Metro) प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहराच्या बाहेरून अनेक नागरिक देखावे पाहण्यासाठी पुण्यात येत असतात. त्यांच्या सेवेकरिता तसेच पुणेकरांच्या सेवेसाठी मेट्रोने (Pune Metro) हा निर्णय घेतला आहे. इतर दिवशी मेट्रो सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेमध्ये धावते. मात्र आता गणेशोत्सव काळात पहिल्या 3 दिवसांमध्ये मेट्रो (7 ते 9 सप्टेंबर) मेट्रो सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे.

विसर्जनाच्या दिवशी दिवस-रात्र सुरू राहणार मेट्रो 

त्यानंतर उत्सवाचे पुढचे 3 दिवस मेट्रो सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12  वाजेपर्यंत धावणार आहे. त्याचबरोबर विसर्जनाच्या दिवशी (17 सप्टेंबर) सकाळी 6 वाजता सुरू होणारी मेट्रो (Pune Metro) दुसऱ्या दिवशी (दि. 18) सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे सलग 24 तास धावणार आहे. 18 सप्टेंबरला पुन्हा ती नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत धावणार आहे.

या वर्षी गणेशोत्सवात मेट्रो सलग 40 तास धावणार आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो (Pune Metro) प्रशासनाने दिली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी वेळेत व फेऱ्यांमध्ये वाढ केली असली तरी मेट्रो प्रशासनाने दर 'जैसे थे'च ठेवले आहेत, त्यात कोणतीही वाढ केलेली नाही, त्यामुळे पुण्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष

पुण्यात ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींसह इतर मंडळाच्या मिरवणुकीला सकाळपासून सुरूवात झाली आहे. मोठ्या संख्येने पुणेकर मिरवणुकीत सहभागी झाले आहेत, सकाळी 10 वाजल्यापासून शहरात मोठी गर्दी दिसून येत आहे. पुणेकर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणरायाचं स्वागत करताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Pune News : पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई अखेर रद्द, नेमकं प्रकरण काय?
पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला अखेर दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
Chatro Ki Gunj Pune : 'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात
'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Embed widget