Pune Metro : पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला नवा मुहूर्त, रविवारी मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दाखवणार हिरवा झेंडा
Pune Metro Inauguration : पावसामुळे रद्द करण्यात आलेला पुणे मेट्रोचा उद्धाटन कार्यक्रम आता रविवारी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील.
![Pune Metro : पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला नवा मुहूर्त, रविवारी मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दाखवणार हिरवा झेंडा Pune Metro inauguration narendra modi to show green flag through video conference on Sunday 29 september marathi news Pune Metro : पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला नवा मुहूर्त, रविवारी मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दाखवणार हिरवा झेंडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/26/fbd4811fb2e0a6ea2105e24994fdc1fa172736997899793_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला आता नवा मुहूर्त मिळाला आहे. येत्या रविवारी, 29 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नरेंद्र मोदी पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवणार आहेत.
पुणेकरांच्या दिमतीला आणखी एक मेट्रो येणार आहे. जिल्हा न्यायालयापासून ते स्वारगेटपर्यंतच्या मेट्रोचं उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार होतं. मात्र पावसामुळे मोदींचा दौरा रद्द झाला आणि मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडलं. मात्र पुणे मेट्रोसाठी उद्घाटनाची औपचारिकता हवीच कशाला? असा सवाल करत मेट्रो सुरू करायला हवी, अशी मागणी पुणेकरांनी सुरू केली. त्यानंतर आता रविवारी या मेट्रोचं उद्धाटन करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुणे शहरातील भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हे 3.62 किलोमीटरचे अंतर आहे.
नवीन पुणे मेट्रो कशी असेल?
स्वारगेट, मंडई आणि कसबा पेठ तीन स्थानके
* अंतर ३.३४ किलोमीटर
* सर्व भूमिगत स्थानकांची कामे पूर्ण
* प्रवासी सोयीसुविधा आणि सुरक्षाविषयक कामे पूर्ण
* स्वारगेट स्थानक येथील पीपीपी तत्त्वावरील मल्टिमोडल हब या इमारतीचे काम अजून बाकी
* सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास केवळ १० मिनिटांत
* स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट स्थानकांमधील अंतर
* सिव्हिल कोर्ट ते कसबा मेट्रो स्थानक अंतर : ८५३ मीटर
* कसबा पेठ ते मंडई मेट्रो स्थानक अंतर : १ किमी
* मंडई ते स्वारगेट मेट्रो स्थानक अंतर : १.४८ किमी
* सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्थानक एकूण अंतर : ३.३४ किमी
कात्रज ते निगडीपर्यंत प्रवास होणार शक्य (स्वारगेट ते कात्रज मेट्रो)
* स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्गिका असणार
* ५.४६ किमीची विस्तारित मार्गिका असेल
* तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल
* मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजीनगर आणि कात्रज ही स्थानके
* २९५४.५३ कोटीपर्यंत खर्च येणार
* फेब्रुवारी २०२९ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य
* मार्केट यार्ड, बिबवेवाडी आणि कात्रज उपनगरांना जोडणार
* मेट्रोने थेट कात्रज ते निगडीपर्यंत प्रवास शक्य
* निविदा प्रक्रिया लवकरच
* दोन ते तीन महिन्यांनंतर
* प्रत्यक्ष कामाला सुरुवात
* भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन, द्विपक्षीय एजन्सी इत्यादींचे समानरीतीने सामाईक योगदान
भूमिगत स्थानकांमध्ये या सुविधा मिळणार
* सरकते जिने, लिफ्टची सुविधा
* सीसीटीव्ही
* माहितीदर्शक एलईडी स्क्रीन
* सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्मवर सेफ्टी डोअर
* एसी (वातानुकूलित यंत्रणा)
* फायर यंत्रणा
* साधे जिने
* ऑनलाइन, ऑफलाइन तिकीट काउंटर सुविधा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)