पुणे : पुण्यातील (Pune) सुप्रसिद्ध रस्ता म्हणजे लक्ष्मी रोड (Laxmi Road). काहीही हवे असेल तर पुणेकरांची पाऊले लक्ष्मी रोडकडे वळतात. आज या लक्ष्मी रस्त्याला 101 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हा दिवस साजरा केला जातो आहे. हा रस्ता पुण्याला समृद्धी देणारा रस्ता मानला जातो. अनेक लोकांच्या आठवणी आणि या  रस्त्याशी भावना जोडल्या गेल्या आहेत. 


कपड्यांची खरेदी असो किंवा सोन्याची, लग्नकार्य असो किंवा सणसमारंभ, खरेदीसाठी  पुणेकरांची पाऊले लक्ष्मी रोडकडे वळतात पुणेकरांच्या खरेदीच्या प्रवासाला 100 वर्ष पूर्ण होतात. आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीचा जसा वाढदिवस साजरा करतो तसे लक्ष्मी रोडला 101 वर्ष पूर्ण होतायत म्हणून इथे विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. क्वार्टर गेट पासून सुरू होणारा लक्ष्मी रोड अलका चौकापर्यंत बघायला मिळतो. अनेक वर्षांपासून इथे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या अनेक आठवणी आहेत.


इथे खरेदी करायला येणं हा लोकांच्या जीवनशैलीचा भाग झाला आहे. काळानुसार बाजारपेठ वाढत गेली असली तरीही लक्ष्मी रोडची क्रेझ कमी झालेली नाही. हा लक्ष्मी रोड म्हणजे पूर्व आणि पश्चिम पुणे आणि इथल्या वेगळ्या संस्कृतींना जोडणारा रस्ता मानला जातो. 3 पट 22 किलोमीटर लांबीचा आणि 10 मीटर रुंदीचा हा रस्ता असून या रस्त्यामुळे पुणे समृद्ध झालं असं म्हणतात. तर काही लोक म्हणतात की दगडूशेठ हलवाई यांच्या पत्नीचे नाव या रस्त्याला दिले गेले. हा लक्ष्मी रस्ता आता वाढत्या गर्दी आणि ट्रॉफीकमुळे काहीसा अपुरा पडायला लागला आहे. मात्र पुणेकरांचे प्रेम कमी झालेलं नाही आहे.


पुणे बदलतं गेलं, त्यासह लक्ष्मी रस्ता बदलतं गेला आणि बाजारपेठ वाढत गेली. मात्र लक्ष्मी रोडवरची होणारी गर्दी काही केल्या कामी होत नाहीय कारण इथे येऊन खरेदी केल्या शिवाय खरेदी केल्यासारखं वाटतं नाही. कितीही ट्रॅफिक आणि गर्दी असली तरीही लक्ष्मी रोडला येऊन खरेदी केली जाते. 


 लक्ष्मी रस्त्याला 101 वर्ष पूर्ण झाल्यामुळे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते या रोषणाईचं उद्घाटन करण्यात आलं आहे. 101 वर्षांनंतरही पुणेकरांना लक्ष्मी रोडचा लखलखाट पाहायला मिळत आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी पुणेकर लक्ष्मी रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत आहे.


हेही वाचा : 


Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण, दोन गटांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्ते भिडले...