पुणे : पुण्यात एका 65 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून पोलीस अधिकारी (Pune Crime News) असल्याचे सांगून व्यक्तींला बेदम मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तळेगाव दाभाडे, चिंचवड, टाकवे या परिसरात ही घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन संशयितांना तत्काळ अटक केली आहे. यामागे आर्थिक कारण असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
श्रीकृष्ण उद्धवराव टकले (वय 65) असे पीडित ज्येष्ठ नागिरकांचं नाव होतं. या प्रकरणी टाकवे येथील शिवाजी राजाराम गरुड (65) आणि तळेगाव दाभाडे येथील अनिल शिवलिंग कोळी (45) अशी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे येथील रहिवासी किरण शंकर खोल्लम (वय 48) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टकले हे फिर्यादी खोल्लम यांचे सासरे होते. टकले हे खोल्लम यांच्या निवासस्थानी असताना, आरोपींनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी टकले यांना ताब्यात घेत असल्याचे सांगून वाहनात बसवले. मात्र, त्यांनी टकले यांना चिंचवड येथील गरुड यांच्या मुलीच्या घरी नेऊन त्यांना बेल्टने बेदम मारहाण केली यात त्यांचा
ज्येष्ठ नागरिकांना मारहाणीच्या घटनेत वाढ
हळदी समारंभातील स्पीकरच्या आवाजावरुन निर्माण झालेला वाद पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर बेतला होता. वादादरम्यान अपमानित झालेल्या या ज्येष्ठ नागरिकाने बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली होती. ज्ञानेश्वर साळुंखे (वय 70 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव होतं. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. याबाबत पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे (वय 47 वर्षे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. नवी खडकी परिसरात तक्रारदार ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या घराशेजारी चेतन बेले राहत होते. त्यांच्या घरात 28 मे रोजी हळदीचा कार्यक्रम सुरु होता. हळदीच्या कार्यक्रमात मोठ्या आवाजात स्पीकर सुरु होता. मात्र स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करा, मोठ्या आवाजाचा आम्हाला त्रास होतो, असं सांगितलं. यावरुन आरोपींनी त्यांना अपमानित केलं आणि तिथून हाकलून दिलं. यानंतरही बराच वेळ मोठ्या आवाजात गाणी सुरु होती. त्यामुळे ज्ञानेश्वर साळुंखे यांनी पुन्हा त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करण्यास सांगितलं. यावेळी आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
इतर महत्वाची बातमी-