पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे दोन गट  (Savitribai Phule Pune University)  आमनेसामने आल्याने गोंधळ (PUNE NEWS) निर्माण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. त्यामुळे भाजपकडून आंदोलन करण्यात येत होतं. याच आंदोलनात दोन विरोधी संघटना आमनेसामने आल्या. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना हा गोंधळ झाला. दोन गटांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. 


पुणे भाजप युवा मोर्चा आणि स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. काही वेळ पुणे विद्यापीठात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांकडून या दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र दोन्ही गट आक्रमक झाल्याने दोन्ही गटाची कार्यकर्ते पोलिसांचं ऐकण्याच्या तयारी दिसत नाही आहे शिवाय पुणे भाजप युवा मोर्चाच्यावतीने काही डाव्या संघटनेचे झेंडेदेखील जाळण्यात आले आहे. त्यामुळे डाव्या संघटनेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहे. दोन्ही गटांमध्ये तुफान धक्काबुक्की झाली आहे. 


एका गटाकडून जय भीम तर दुसऱ्या गटाकडून वंदे मातरम् च्य़ा घोषणा दिल्या जात आहे. यात महिला कार्यकर्त्यांचादेखील समावेश आहे. महिलां कार्यकर्त्यांमध्येही जोरदार राडा झाला आहे. महिलांना हात लावता, तुमच्या पुरुषांना लाजा वाटत नाही, असा आरोप डाव्या संघटनेकडून केला जात आहे. त्याविरोधात भाजपच्या महिलादेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण?


शिक्षणांचं माहेरघर असलेल्या पुण्यात आणि ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 8 नंबरच्या वसतीगृहातील पार्कींगमध्ये काळ्या रंगाने आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं आहे. काल रात्री उशीरा ही माहिती समोर आली. त्यानंतर विद्यापीठातील वसतीगृहातील संपूर्ण परिसर मोकळा केला आहे. या ठिकाणी कोणालाही जाण्यास आता विद्यापीठ प्रशासनाकडून बंदी करण्यात आली आहे.  त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या बाहेर भाजप आंदोलन करत होते. या सगळ्यांसंदर्भात गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीन करण्यात येत होती. त्याच दरम्यान डाव्या संघटनेचे कार्यकर्तेदेखील आले. घोषणाबाजी सुरु असतानाच हा राडा झाला. दोन्ही गट एकमेकांवर भिडले. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. 


 



इतर महत्वाची बातमी-