पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचार जोमात सुरु आहे. पुण्याच्या विविध विषयांवर आणि समस्यांवर भाष्य करत आणि टीका करत त्याचा प्रचार सुरु आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा असतानाच काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
सार्वजनिक वाहतूक, ज्येष्ठ नागरिक, कायदा आणि सुव्यवस्था, नागरी सुरक्षेसह आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, उद्योग, असंघटित कामगारांच्या हिताला या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्याला 'न्यायपत्र' असे संबोधण्यात आले होते. त्यानंतर धंगेकर यांनी पुण्यासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
निरोगी, आनंदी, सुरक्षित पुण्यासाठी हा जाहीरनामा तयार करण्यात आला असल्याचं धंगेकरांनी सांगितलं आहे. या जाहीरनाम्यात साधारण 11 मुद्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण, पीएमपी, मेट्रो आणि रेल्वे यांमध्ये समन्वय, नवीन विमानतळ, वर्तुळाकार मार्गासाठी प्राधान्य, मेट्रोमार्गिकांचे विस्तारीकरण, आरक्षित जागांवर बहुमजली वाहनतळ व्यवस्था उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच शहर अमली पदार्थमुक्त करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेवस्था राखण्यात येणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
त्यासोबतच ड्रग्स मुक्त पुणे करण्यासाठी प्रयत्न असणार आहे. पादचाऱ्यांसाठी प्रशस्त पदपथांची उभारणी आणि दुरुस्ती, प्रत्येक प्रभागात मोहल्ला दवाखाना संकल्पना, ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या धर्तीवर नवीन सरकारी रुग्णालयाची उभारणी, औद्योगिक गुंतवणुकीसाठी विशेष प्रयत्न, रिक्षाचालक आणि मालक, घरेलू कामगारांसाठीदेखील वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचं या जाहीरनाम्यात दिलं आहे.
पुण्यात सध्या तगडी लढत दिसत आहे. रवींद्र धंगेकरांविरोधात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ उभे ठाकले आहे. दोघांकडूनही जोमार प्रचार सुरु आहे. मोहोळांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली तर रवींद्र धंगेकरांसाठी राहुल गांधी यांनी पुण्यात सभा घेतली. यावेळी दोन्ही पक्षांनी एकमेंकावर जहरी टीका केली. पुण्यातील विविध मुद्यांवरुन प्रत्येक सभेतून एकमेकांवर टीका केली जाते.पुणेकरांची पसंती नेमकी कोणाला आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
Ajit Pawar: बारामतीत मतदानाच्या दिवशी अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, आईला सोबत आणलं अन्...
Ajit Pawar: बोटाला मतदानाची शाई लागताच अजितदादांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली, म्हणाले...