Hatkanangle Lok Sabha Election Voting 2024 : Raju Shetti : हातकणंगलेत (Hatkanangle Lok Sabha Election 2024) आज लोकसभेसाठी मतदान (Lok Sabha Voting) प्रक्रिया पार पडत आहे. निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासूनच हातकणंगले मतदारसंघ चर्चेत होता. अशातच आज दिग्गजांचं भवितव्य मतदार ठरवणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) हातकणंगलेमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांनी माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच, 2019 मध्ये कटकारस्थान करून सर्वांनी मिळून माझा पराभव घडवून आणला असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. यासोबतच मुख्यमंत्री हातकणंगलेमध्ये ठाण मांडून बसले होते, तरी काहीही होणार नाही, माझा विजय निश्चित आहे, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.


दरम्यान, राजू शेट्टी मतदानासाठी त्यांच्या घरातून रवाना झाले असून मतदानाला घरातून निघण्यापूर्वी कुटुंबियांनी राजू शेट्टी यांचं औक्षण केलं. 


2019 मध्ये कटकारस्थान करत माझा पराभव, यंदा मात्र मी सावध : राजू शेट्टी 


राजू शेट्टी यांनी मतदानासाठी घरातून निघण्यापूर्वी माध्यमांशी बातचित केली. राजू शेट्टी म्हणाले की, "2019 मध्ये कटकारस्थान करून सर्वांनी मिळून माझा पराभव घडवून आणला, मात्र यावेळी आम्ही सावध आहोत, माझा विजय निश्चित आहे. मुख्यमंत्री हातकणंगलेमध्ये ठाण मांडून बसले होते, तरी काहीही होणार नाही, माझा विजय निश्चित आहे."


आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं; राजू शेट्टींचं आवाहन 


"शेतकरी वर्गानं सरकारच्या धोरणानुसार मत द्यायला शिकायला हवं. आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं अशी अपेक्षा आहे. माझ्या 99 वर्षाच्या आईचे आशीर्वाद माझे पाठीशी आहेत. काही दिवसांपूर्वी तिने ज्येष्ठ मतदारांसाठीच्या घरातून मतदानाच्या सोयीचा लाभ घेत मतदान केला आहे. तिचा मत मला मिळाला आहे म्हणून माझा विजय निश्चित आहे.", असंही राजू शेट्टी म्हणाले. 


दरम्यान, हातकणंगलेमध्ये महायुतीकडून धैर्यशील माने रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरुडकर रिंगणात आहेत. त्यामुळे लोकसभेचं मैदान कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


पाहा व्हिडीओ : Raju Shetti Voting Hatkanangale : राजू शेट्टी यांचं कुटुंबाकडून औक्षण, मतदानासाठी रवाना



महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Lok Sabha Voting Live: राज्यात आज 11 मतदारसंघात मतदान; दिग्गजांचं भवितव्य मतदार राजाच्या हातात!