Pune Lockdown : राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोना आणि लॉकडाऊनबाबत अफवा देखील पसरत आहेत. अशातच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र पुण्यात लॉकडाऊन करण्याबाबत कुठलेही आदेश नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
CoronaVirus Lockdown | लॉकडाऊनसंदर्भातील अफवा पसरवाल, तर दंडात्मक कारवाई
पुण्यात काही जुन्या माहितीचे व्हिडीओ, फोटो वापरत ठराविक भागांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. नुकतंच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथेही लॉकडाऊन लागू केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळं जनमानसात संभ्रमाचं वातावरणही पाहायला मिळत आहे. पण, तूर्तास पुण्यात कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात आलेली 'पुण्यात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊन' अशा आशयाचा एका चॅनेलचा जुन्या बातमीचा व्हिडीओ पुन्हा एकदा कोणीतरी व्हायरल केला आहे. सध्या तरी पुण्यात प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक तसेच ग्रुपचे नाव ( स्क्रीन शॉट सह) पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. कृपया, कोणीही अफवा पसरवू नये, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कळविले आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे BMC अलर्ट मोडवर
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे. ज्यात मागील दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरन्ट्स बार आणि हॉटेल्सवर कारवाई धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. काल रात्रीच्या सुमारास वांद्रे आणि खार परिसरातल्या पाच रेस्टॉरन्ट, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण 650 जणांवर महापालिकेकडून 1 लाख 40 हजारांचा दंड वसूल केला आहे. वांद्रे येथील 145 कॅफे अॅण्ड बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं. यात सदर व्यवस्थापनावर संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात एच वॉर्डच्या आरोग्य खात्यातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात काही कॅफे अॅण्ड बारवर 188, 269 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत वांद्र्यातील आयरिश हाऊस, खार स्टेशनजवळील क्वॉर्टर पिलर, थ्री वाईस मंकी आणि यू-टर्न लाऊन्जमध्ये देखील महापालिकेकडून तपासणी करण्यात आली. ज्यात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिग आणि विना मास्क असलेले ग्राहक आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर देखील महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली गेली आहे.. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पालिकेकडूनही वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु असल्याचं बघायला मिळत आहे... जोपर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही तोपर्यंत कारवाई सुरुच राहणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
धोका वाढला! महाराष्ट्रामागोमाग देशातही कोरोनाचा फैलाव; 5 राज्यांमध्ये अलर्ट
राज्यात अमरावतीत सर्वाधिक रुग्णांची नोंद
अमरावती जिल्ह्यात कोरोना संसर्गाने शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून पुन्हा 1055 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 28,815 इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमित रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. महापालिकेत आयुक्त प्रशांत रोडे यांनी होम आयसोलेशन आणि स्वॅब सेंटरचा आढावा घेतला, तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केंद्रांना भेटी दिल्या. रात्रीपासून जिल्ह्यात 36 तासांसाठी लॉकडाऊन सुरू झालेला आहे. आता याला अमरावतीकर कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.