Pune Leopard News : पुणेकर बिबटे आता 'गुजराती' होणार; केंद्र सरकारने परवानगी दिल्याचा वन विभागाचा दावा
पुणे जिल्ह्यातील 10 बिबटे आता गुजरातच्या जामनगर (Leopard ) येथील सेंट्रल झु-मध्ये स्थलांतरित केले जाणार. बिबट आणि मानव यांमधील संघर्ष मिटविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील 10 बिबटे आता गुजरातच्या जामनगर (Leopard ) येथील सेंट्रल झु-मध्ये स्थलांतरित केले जाणार. बिबट आणि मानव यांमधील संघर्ष मिटविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारने याला परवानगी दिल्याचा दावा वन विभागाने केला आहे. गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्यासाठी उपाययोजना तयार करण्यात आल्यात त्यासाठीची केंद्राची परवानगीही मिळालीय त्यामुळे आता जुन्नरचा बिबट गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झूमध्ये पाहुणा म्हणून जाणार आहे.
अमोल कोल्हे यांनी ही या निर्णयाचं स्वागत केलंय मात्र हि तातपुरती मलमपट्टी असून या परिसरात 700 बिबटे आहेत त्यामुळे उर्वरित बिबट्यांचं काय? असा सवाल उपस्थित करत बिबट प्रजनन नियंत्रणाच्या दृष्टीने पाऊल उचलणं आणि माणूस संघर्ष कमी करण्यासाठी राज्य आपत्ती घोषित करण असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंं आहे.
बिबट्याची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. 100 बिबटे गेले तरी 600 रुपये तिथेच राहणार आहे. बिबट प्रजननाच्या दृष्टीने विचार व्हायला हव्यात. त्यासोबत बिबट्याचे हल्ले कमी व्हावे, यासाठी उपाययोजना करायला हव्यात आणि राज्य आपत्ती घोषित करण्यात यावी त्यामुळे योग्य निधी मिळेल. डिसेंबर महिन्यात मी आणि वनविभागाने बिबट प्रजननाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. त्यामुळे राज्य सरकारकडून याचा पाठपुरावा करणं आणि तो केंद्र सरकारकडे जाणं गरजेचं आहे. त्यामुळे सरकारने या प्रस्तावाचा विचार करावा, अशी विनंती अमोल कोल्हेंनी केली आहे.
बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी ठोस निर्णय व्हावा याकरता मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांची तातडीने भेट घेणार
वाढत्या बिबट्याच्या हल्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, या भागातील नागरिकांचे जगणेही मुश्किल झाल्याने जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे हे बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्याचं आढळराव पाटलांनी सांगितलं आहे. जुन्नर आणि शिरूरसह आजूबाजूच्या तालुक्यात बिबट्यांचा मोठा वावर झाला आहे. एकाच महिन्यात पाच मनुष्यवध झाले आहे. जुन्नर तालुक्यातील लोकांना घरातून बाहेर पडताना जीव मुठीत धरून पडावे लागत असून लोक भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या हल्यात मृत्युमुखी झालेल्या कुटुंबातील माझी महिला भगिनी 'तुमची 25 लाखाची मदत परत घ्या, आमची मुलगी आम्हाला परत करा' असा आज टाहो फोडत आहे. हे दृश्य पाहून अंतःकरण भरून येत आहे, असंही आढळराव पाटील म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-