एक्स्प्लोर

Pune Leopard News : दबक्या पावलांनी आला, मालकासमोरच कुत्र्याला घेऊन गेला; बिबट्याच्या वावरामुळे नागरिक धास्तावले...

जुन्नर तालुक्यातील कल्याण-नगर महामार्गावर आळेफाटा परिसरातील ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स यांच्या पत्रा शेडमध्ये असणाऱ्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार करून पसार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

Pune Leopard News : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. त्यात बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राण्याचा जीवही गेल्याच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील कल्याण-नगर महामार्गावर आळेफाटा परिसरातील ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स यांच्या पत्रा शेडमध्ये असणाऱ्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार करुन पसार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री (14 मे) सव्वा दोन वाजताच्या सुमारास घडली. यात शेडमध्ये झोपलेला तरुण मात्र बचावला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

आळेफाटा परिसरातील कल्याण रोडवर सुदामा मुन्निलाल शर्मा यांचे ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स या नावाने रिपेअरिंगचे गॅरेज आहे. रविवारी रात्री दिवसभरातील कामे आटोपून त्यांचा मुलगा सुधाकर आणि पाळीव कुत्रा नेहमीप्रमाणे पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास बिबट्या वाहनांच्या आडोशाने दबक्या पावलांनी आला. बिबट्याने अचानक कुत्र्यावर हल्ला केला. कुत्र्याचा आवाज आल्याने सुधाकर यास जाग आली. मात्र डोळ्यादेखत बिबट्याने कुत्र्याची शिकार करुन बिबट्या पसार झाला. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

काही दिवसांपूर्वी बिबट्याने सहा फुटी सुरक्षा भिंतीवरुन उडी घेत, पाळीव कुत्र्याची शिकार केली होती. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. 30 एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना घडली होती. पुण्याच्या मंचरमधील ही घटना होती. मात्र या बिबट्याने थेट सहा फुटी सुरक्षा भिंतीवरुन उडी घेत अशी शिकार केल्याने बिबटक्षेत्र परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरलं होतं.

नागरिक धास्तावले...

मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या बिबट्याचा धडकी भरवणारा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. यात बिबट्या थेट सहा फूट उंच असलेल्या भिंतीवरुन उडी मारुन घरात शिरताना दिसत आहे आणि कुत्र्यावर हल्ला करुन त्याची शिकार केल्याचं दिसत आहे.

हेही वाचा

Pune leopard : कुत्रा निवांत झोपलेला, बिबट्याने थेट सहा फूट उंच भिंतीवरुन झेप घेतली अन्...; थरारक व्हिडीओ समोर

महत्त्वाच्या बातम्या

सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
Embed widget