एक्स्प्लोर

Pune Leopard Attack : दबक्या पावलांनी घरात शिरला अन् थेट कुत्र्यावर हल्ला केला; खेड तालुक्यात बिबट्याची दहशत; पाहा व्हिडीओ

श्री क्षेत्र भानोबाची कोयाळी गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. कोळेकर वस्ती येथील घरा समोरून बिबट्याने थेट कुत्र्याला ओढून नेलं आहे.

Pune Leopard Attack :  पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात मागील (Leopard Attack ) काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावकरी धास्तावले आहेत. कधी कुत्रा तर कधी मांजरीची शिकार करताना बिबटे दिसत आहे. अशीच एक घटना पुण्यातील खेड तालुक्यातून समोर आली आहे. श्री क्षेत्र भानोबाची कोयाळी गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. कोळेकर वस्ती येथील घरा समोरून बिबट्याने थेट कुत्र्याला ओढून नेलं आहे. कोयाळी गावातील संतोष आणि भानुदास इंगळे यांच्या घरासमोरील अंगणात घडला प्रकार घडला आहे.

हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

बिबट्याने केलेल्या कुत्र्याच्या शिकारीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या व्हिडीओत तीन कुत्रे आणि बिबट्यांची खडाजंगी दिसत आहे. तीन कुत्रे आणि बिबटे एकमेकांवर भिडलेले दिसत आहे. त्यात काही वेळाने थेट बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला आणि त्याला तोंडात धरुन कुत्र्याची शिकार केल्याचं दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाने लवकर पावले उचलण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

चाकणमध्येही केला होता बिबट्याने शिरकाव

मागील महिन्यात पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये पहाटे बिबट्या आढळला होता. हा बिबट्या मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत घुसल्याचं कंपनीमधील एका चालकाच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बिबट्या असल्याची खात्री करून घेतली. तसेच त्यांनी याबाबत वनविभागाला कळवलं होतं. जवळपास सात तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमधील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आलं होतं. चाकण एमआयडीसीत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या असल्याने, या एमआयडीसीची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख आहे. याच एमआयडीसीमधील मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत आज बिबट्याने शिरकाव केला होता. यामुळं एमआयडीसीसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली होती. कंपनी साधारण शंभर एकरमध्ये विस्तारल्यानं बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर होतं. मदतीला पिंपरी चिंचवड पोलीस ही दाखल झाले होते.

नागरिक धास्तावले...

मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या बिबट्याचा धडकी भरवणारा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. यात बिबट्या थेट  तीन कुत्र्यांवर हल्ला केलेला दिसत आहे.  त्यातील एकता कुत्र्याची शिकार केल्याचंदेखील सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget