पुणे : पुणे कल्याणीनगर (Pune Kalyani Nagar) अपघात प्रकरणातील (Porsche Accident) अल्पवयीन आरोपी 25 जूनपर्यंत बाल सुधारगृहातच राहणार आहे. बाल न्याय मंडळाच्या न्यायाधीशांनी त्याला आणखी सहा दिवस बालसुधारगृहात पाठवलं आहे. यावर 25 जून रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, या मुलाला घरी सोडल्यास तो नातेवाईकांच्या मदतीनं तपासावर परिणाम करू शकतो. तसंच, त्याच्या जीवाला देखील धोका आहे, त्यामुळे त्याला घरी सोडू नये असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीनं करण्यात आला.
कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आणखी 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याची मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केली. तर बचाव पक्षाने मुलाला घरी सोडण्याची विनंती केली होती.कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलीसांनी युक्तिवाद केला की, अपघाताचा तपास सुरु आहे. मुलाला घरी सोडल्यास इतर नातेवाईकांच्या मदतीने तपासावर परिणाम करेल. बाल सुधारगृहात मुलाचे समुपदेशन सुरु आहे. ते पूर्ण व्हायचे आहे. त्यासाठी त्याला इथेच ठेवावे. मुलाच्या घरी त्याची काळजी घ्यायला कोणी नाही. त्याच्या मनावर परिणाम हऊ शकतो. अल्पवयीन मुलाच्या जीविताला बाहेर धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याला बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी पोलीसांनी केली आहे.
अल्पवयीन आरोपी 25 जूनपर्यंत बाल सुधारगृहातच राहणार
बाल न्याय मंडळाचे नियमित मुख्य न्यायाधीश उपस्थित नव्हते त्या जागी दुसऱ्या न्यायाधीशांनी सुनावणी घेतली . मी नियमित न्यायाधीश नसल्याने अल्पवयीन आरोपीबाबतचा निर्णय 25 जूनला घेण्यात येईल अस म्हणत न्यायालयाने कामकाज स्थगित केलं. अल्पवयीन आरोपी 25 जूनपर्यंत बाल सुधारगृहातच राहणार आहे.
विशाल, शिवानी अग्रवालला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल यांच्यासह अश्फाक मकानदार या तिघांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालच्या मुलाचे रक्ताचे सॅम्पल कुठे फेकले? ते सॅम्पल नेमके कुणी फेकले? यात अजून कोणी सहभागी आहेत का? याची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.
विशाल आणि शिवानी अग्रवालवर पोलिसांचा संशय
विशाल आणि शिवानी अग्रवाल यांनी रक्ताचा नमुना पुरावा नष्ट केल्याचा दाट संशय पोलिसांना असून, हा रक्त नमुना कुठे आणि कसा नष्ट केला कुणाच्या सांगण्यावरून केला याबाबत तपास पोलिस करणार आहेत. अश्फाकने कुणाच्या सांगण्यावरून अग्रवाल दाम्पत्याला मदत केली? याचा शोध पोलिस घेणार आहेत. आरोपी विशाल हा आश्फाक, डॉ. तावरे आणि डॉ श्रीहरी संपर्कात असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.
हे ही वाचा :