Accident : पुण्यात भरधाव वाहनांच्या धडकेत मृत्युची आणि हिट अँड रनची मालिका सुरुच आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिट अँड रनची घटना उघडकीस आली. अन्य एका अपघातात मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील वाटुळ घाटात डंपरचा अपघात दरीत कोसळला. यावेळी डंपरने पेट घेतल्याने चालकाचा दुर्दैवी करुण अंत झाला. या भीषण अपघातात डंपर चालकाचे दोन तुकडे झाले.
पुण्यात आज (12 जून) मार्केट यार्ड पोलिस ठाणे हद्दीत गंगाधाम चौक, बिबवेवाडी फायरब्रिगेड समोर, कोंढवाकडून गंगाधाम चौकाकडे येणाऱ्या आई माता मंदिर रोडजवळ डंपरने दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर डंपर चालकास ताब्यात घेण्यात आलं आहे.
चाकणमध्ये विजेचा शॉक लागून मायलेकाचा मृत्यू
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील चाकणमधील खराबवाडीत घराच्या छतावर वीजेचा शॉक लागून मायलेकाची जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. घराच्या छतावर आईसोबत 15 वर्षीय मुलगा छतावर आला असताना बाजुला असणाऱ्या पत्र्यात विद्युत प्रवाह उतरल्याने मुलाला शॉक लागला. यावेळी आई बचावासाठी गेली असता आईलाही शॉक लागला. यामध्ये 15 वर्षीय मुलासह आईचा शॉक लागून अंत झाला. या घटनेमुळे चाकण खराबवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पल्लवी जाजू आणि समर्थ जाजू अशी मायलेकांची नावे आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये हिट अँड रनची घटना
दुसरीकडे, छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज महानगर 2 भागात हीट अँड रनची घटना समोर आली. काल (11जून) रात्री पावणे अकरा वाजता वसंत विनायकराव ठोंबरे नाईट शिफ्टला जात असताना त्यांना चार चाकी पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार चाकीचा शोध सुरू आहे.
रत्नागिरी-मुंबई गोवा महामार्गावर वाटुळ येथे डंपरचा भीषण अपघात
दरम्यान, रत्नागिरी-मुंबई गोवा महामार्गावर वाटुळमध्ये डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात डंपर चालकाचा मृत्यू झाला. अपघातात डंपरने पेट घेतल्याने चालकाचे दोन तुकडे झाले. कमरेखालील भाग अपघातात जळाला गेला आणि धड 70 ते 80 फुटांवर फेकले गेले.
इतर महत्वाच्या बातम्या