पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणातील धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या बदल्यात ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोरला तीन लाखांची लाच घेऊन सॅम्पल कचऱ्यात फेकल्याने अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.
चार लाख पाठवले आणि तीन लाख दिले
रक्ताचे सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हळनोरला अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांनी तीन लाख रुपये बाल हक्क न्याय मंडळाच्या आवारात दिले होते. पोलिस तपासात हे उघड झाल्यानंतर अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाडला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीतून लाचेच्या पैशातही अफरातफर झाल्याचे समोर आलं आहे.
अशपाक मकानदारला ज्या व्यक्तीने पैसे दिले त्या व्यक्तीने तीन लाख नव्हे, तर चार लाख रुपये दिले होते. मात्र, अशपाकने त्यापैकी तीन लाख रुपये डॉक्टर श्रीहरी हळनोरला अतुल घटकांबळेच्या मार्फत दिले. चार लाख रुपयांमधील एक लाख रुपये स्वतःकडे ठेवले. पोलिसांना आता एक लाख रुपये शोधायचे आहेत. तसेच अशपाककडे चार लाख रुपये कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून दिले याचा तपास सुद्धा पुणे पोलिसांकडून सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात किती मोठी साखळी गुंतली आहे याचा अंदाज येण्यास पुरेसा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या