एक्स्प्लोर

Pune Rain Update : पुण्यात पावसाची उसंत, खडकवासलातून पाण्याचा विसर्गही घटला; पण एकता नगरमध्ये वीज गायब, प्यायला पाणीही नसल्याने नागरिकांचे हाल

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा करण्यात कमी आला आहे. खडकवासला धरणातून आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

पुणे : पुण्यातील महापुराचा (Pune Flood)  मोठ्या प्रमाणावर पुणेकरांना फटका बसलाय. आज पुण्यात पावसानं विश्रांती (Pune Rain Update)  घेतलीय. दरम्यान खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam)  विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. सिंहगड रोड, एकतानगर परिसर काल जलमय झाला होता. दरम्यान आज खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय त्यामुळे आज पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे.  अनेक भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरलंय. मात्र या पुरामुळे पुणेकरांचं प्रचंड नुकसान झालंय. अनेकांचं संसार वाहून गेलेत..दरम्यान व्यापाऱ्यांचं ही प्रचंड नुकसान झालंय.  दरम्यान आज मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्प्रेस या गाड्या रद्द झाल्यात.

खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे एकतानगर, सिंहगड रोड, संगम परिसर, शिवाजीनगर, हॅरीस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पूल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. त्यांना आवश्यक सुविधाही दिल्या असून, पूरस्थिती नियंत्रणात आहे. सध्या पावसाने देखील विश्रांती घेतली आहे, 

खडकवासला धरणातून विसर्ग कमी

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा करण्यात कमी आला आहे. खडकवासला धरणातून आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 31 हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.

एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी हे अजून महानगरपालिकेकडून  पोहोचवण्यात आलेलं नाही.तसेच  वापरण्यासाठी पाणी नाही.   या परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. पाणी ओसरल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी या ठिकाणी येऊन साफसफाई करत आहेत... 

पुणे, पिंपरीतील शाळा, महाविद्यालयाना आज सुट्टी 

पुण्याला  हवामान विभागाने शुक्रवारी  आज  (ऑरेंज अलर्ट) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने शाळा आणि  महाविद्यालयांना  सुट्टी जाहीर केली.  भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणेपिंपरी चिंचवड शहरातील शाळा आज  बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे अशा ही सूचना केल्या आहेत.

हे ही वाचा :

Pune Rain: पुण्यात आर्मी... पावसाचा हाहाकार, पूर पीडितांच्या मदतीसाठी 85 जणांची टीम तैनात

 

 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Embed widget