LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील पुरस्थितीचा घेतला आढावा, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

Heavy Rain in Western Maharashtra: पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

रोहित धामणस्कर Last Updated: 25 Jul 2024 05:03 PM
मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे दरम्यानच्या एक्सप्रेस गाड्या रद्द

मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान धावणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. बदलापूर आणि वांगणी दरम्यान उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेऊन या एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मध्य रेल्वे सांगितले आहे. मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आलेले आहेत, तर उद्या सकाळी पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द असतील.

Ajit Pawar On Pune Rain : पुण्यातील वारजे भागात ज्या जनावरांचा मृत्यू झाला त्याचे पंचनामे केले जाणार, अजित पवारांनी दिली माहिती

पुण्यातील वारजे भागात म्हशी ज्या जनावरांचा मृत्यू झाला त्याचे सुद्धा पंचनामे केले जाणार आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. वारजे येथील स्मशानभूमी परिसरातील नदी पात्रालगत जनावरे बांधली होती. रात्री अचानक पाऊस सुरू झाला. नदीपात्रातील पाणी वाढल्याने पाणी गोठ्यात शिरलं. हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला. या गोठ्यात बांधलेली 14 जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली आहेत. यामध्ये 11 गाईंचा समावेश आहे. तर चार ते पाच जनावरे पाण्यात तोंड वर करून उभी राहिल्याने बचावली आहेत.

Pune Rain : अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून मदत व बचत कार्याचा घेतला आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका येथे अधिकाऱ्यांकडून मदत व बचत कार्याचा आढावा घेतला. नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली व पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग करण्याच्या  सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. लवासा येथे दरड कोसळल्याने मदत कार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासन सतर्क राहून काम करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन. दुर्घटनेत जखमी झालेल्याचा खर्च महानगरपालिका व शासनातर्फे करण्याच्या सूचना. वेगवेगळ्या भागात एनडीआर एफच्या तुकड्या तैनात. आंबील ओढा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Pune Rain Update: पुण्यात गोठा बुडून 14 जनावरे दगावली, नदीपात्रातील पाणी वाढलं अन्...

वारजे येथील स्मशानभूमी परिसरातील नदी पात्रालगत जनावरे बांधली होती. रात्री अचानक पाऊस सुरू झाला. नदीपात्रातील पाणी वाढल्याने पाणी गोठ्यात शिरलं. हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला. या गोठ्यात बांधलेली 14 जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली आहेत. यामध्ये 11 गाईंचा समावेश आहे. तर चार ते पाच जनावरे पाण्यात तोंड वर करून उभी राहिल्याने बचावली आहेत.

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाने अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली

पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक छोटे आणि मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पुण्यातील बहुतांश अंडरपास सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक कोंडी आणि इतर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे. 


बंद असलेले पूल आणि अंडर पास पुढीलप्रमाणे


शांतीनगर पूल
भिडे पूल
न. ता. वाडी अंडरपास
जयवंतराव टिळक पूल 
जुना होळकर ब्रीज
जुना मांजरी पूल
पोल्ट्री अंडरपास 
बोपोडी अंडरपास

Satara Rain : कण्हेर, वीर धरणातून विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरु असून कण्हेर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. कण्हेर धरणातून 5 हजार क्युसेक वेगाने  पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर वीर धरणातून 13 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Pune Rain: राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना

मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्वं करणार आहेत. 

Pimpri-Chinchwad Rain Update: ताथवडे परिसरात घरात पाणी शिरलं, अद्याप पाऊस सुरूच

पुणे शहर परिसरात काल  रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अद्याप पाऊस सुरूच आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ताथवडे परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे.अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. 

Pimpri-Chinchwad Rain Update: पिंपरी चिंचवडच्या घरकुल सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी

पिंपरी चिंचवडच्या घरकुल सोसायटीत चहू बाजूनी पाणीचं पाणी झालं आहे. या सोसायटीतील 165 इमारतींपैकी 25 इमारतीच्या आवारात पाणी शिरले आहे. त्यामुळं इथले नागरिक रात्रभर झोपलेले नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून इथं हीच परिस्थिती उद्भवते.

Ajit Pawar on Pune Rain: रस्त्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली, खडकवासला धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस; अजितदादांनी सांगितलं पुण्यातील जलप्रलयाचं कारण

पुण्यात पुढेही पाऊस राहणार आहे. मी तातडीने पुण्याला जात आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट केलं आहे. एकता नगरमध्ये स्वत: आयुक्त पोहचले आहेत, असं अजित पवारांनी सांगितले. जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते. आत्ता जमीन सगळी गेले दोन-तीन दिवसाच्या पावसामुळे ओली आहे. पुण्यात पेव्हर ब्लॉक आणि सिमेट काॅक्रीट रस्ते आहे. पुण्यात सकाळी धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सगळीकडे पाऊस असल्याने नदी ओव्हरफ्लो झाली असल्याने सकल भागात पाणी साचलेले आहे, असं अजित पवारांनी सांगितले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Pune Rain Update: खडकवासला धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी; पाणी ओसरायला सुरुवात

खडकवासला धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करुन पंधरा हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र हे पाणी कमी होणं तात्पुरतं ठरु शकतं. कारण पावसाचा जोर पाहता पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे या संधीचा उपयोग करून सखल भागातील लोकांनी घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी येण्याची गरज आहे.

Pune Rain: सर्वांनी फिल्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा; एकनाथ शिंदेंचे आदेश

पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain)अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना नागरिकांना आवाहन केलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Pune Rain Update: मावळ मधील कुंडमळा येथे पर्यटकांना बंदी, पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ

मावळ तालुक्यात काल पासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे असणारी इंद्रायणी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळा येथे पाणी साकव पुलापर्यंत आले आहे. कुंडमळा परिसरात असणाऱ्या कुंडदेवी मातेचे मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. कुंडमळा परीसरात वर्षाविहार करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र कुंडमळा येथे पाण्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांना येथे बंदी घालण्यात आली आहे.

Pune Rain : पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात शिरलं पाणी

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात पाणी शिरलं आहे. पुण्यातील शनिवार पेठेत असलेल्या महादेवाच्या मंदिरात पाणी शिरलं आहे. पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंदिरात पाणी गेलं आहे. मंदिराच्या शेजारी असलेल्या मुठा नदीत खडकवासला धरणाच्या पाण्याचा विसर्ग होतो आहे. सकाळच्या सत्रात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे.

Pune Rain: पुण्यातील एकता नगर, निंबजनगर भागात नागरिकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू बोटी

Pune Rain: बाळाला खांद्यावर घेत बाप पाच फूट पाण्यात चालला..

Pune Rain: पुण्यातील पावसावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मी सतत हवामान खातं आणि अधिकाऱ्यांशी बोलत आहे. पुण्यात पेव्हर ब्लॉक आणि सिमेट काँक्रिट रस्ते आहेत. पुण्यात सकाळी धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सगळीकडे पाऊस असल्याने नदी ओव्हरफ्लो झाली असल्याने सखल भागात पाणी साचलेले आहे.

मोठी बातमी: खडकवासला धरणातील पाण्याची विसर्ग कमी केला

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करुन पंधरा हजार क्युसेक्स करण्यात आलाय. सकाळपासून धरणातून 40 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता.

Pune Rain : नागरिकांना अलर्ट का पोहोचवला नाही? पुण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष : सुप्रिया सुळे

पुण्यात प्रशासनाचे लक्षच नाहीये. नागरिकांना एवढ्या पावसाचा अलर्ट का पोहोचवला नाही, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. तसेच गरज नसेल तर विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहनदेखील त्यांनी पुणेकरांना केले.  

Kolhapur Rain: राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला

राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला. सहा नंबरच्या दरवाजामधून भोगावतीच्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune Rain: एबीपी दाखवलेल्या बातमीनंतर निंबजनगरमध्ये प्रशासनाकडून बचावकार्य सुरू, अनेक नागरिक अडकले

पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागात पाणी छातीपर्यंत साचलं आहे. पुण्याच्या अनेक भागात लोक अडकले आहेत. प्रशासनाकडून काही भागात बचावकार्यसुरू केलं आहे. पुण्यातील सिंहगड परिसरातील निंबजनगर येथे मोठ्या प्रमाणावर लोक अडकले होते. याठिकाणी प्रशासन पोहोचलेलं नव्हतं. एबीपी माझाने याबाबचे वृत्त दाखवल्यानंतर आता बचावकार्य सुरू झाले आहे. अनेक जण आपल्या घरामध्ये अडकून पडले आहेत. अद्याप मुसळधार पाऊस कोसळत आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 


 

Pune Rain : पुण्यात पावसाचं थैमान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला परिस्थितीचा आढावा

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला.

Sangli Rain: वारणा धरणातून पाणी सोडणार

वारणा धरण पाणलोट  क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने आज दि. २५/७/२०२४, दु: १:०० वा वारणा धरणातून सद्यस्थीत सूरु असलेल्या ८८८६ क्यूसेक विसर्गात वाढ करुन वक्र द्वार द्वारे ८८१२ क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६५८ क्यूसेक असे एकुण १०४६० क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.तरी नदीकाठ च्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Pune Rain: पुण्यातील शाळा, महाविद्यालयं आणि कार्यालयांना सुट्टी

पुणे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर पुण्यातील सर्व कार्यालयांनाही सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कंपन्यांना केले आहे.

Pune Rain : पुण्यात पावसाचं थैमान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला परिस्थितीचा आढावा

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला.

Pune Rain : पुण्यात पावसाचं थैमान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला परिस्थितीचा आढावा

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला.

Kolhapur Rain: कोल्हापूमध्ये मुसळधार पाऊस, अलमट्टी धरणातून पाण्याची विसर्ग वाढवला

कोल्हापूर- सांगली जिल्ह्यासाठी दिलासा देणारी बातमी. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. आतापासून अडीच लाख क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. 2 लाखावरून विसर्ग अडीच लाख केला

Pune Rain : भिमाशंकर मार्गावर दरड कोसळली

भिमाशंकर-राजगुरुनगर मार्गावर मोरोशी शिरगाव फाट्यावर दरड कोसळल्याची घटना घडली असून बाजुलाचा असणारा जनावरांचा गोठा थोडक्यात बचावला आहे. प्रशासनाकडून दरड काढण्याचे काम सुरु असून राजगुरुनगरमार्गे भिमाशंकरला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Pune Rain: पवना धरणक्षेत्रात रेकॉर्डब्रेक पाऊस, एका रात्रीत पाणीसाठा 10 टक्क्यांनी वाढला

पुणे जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात असून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्येही पावसाचा प्रचंड जोर आहे. पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण (Pawna Dam) परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे. गेल्या बारा तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसाने अशी तुफान बॅटिंग केल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यात अवघ्या 12 तासांमध्ये थेट 10 टक्के वाढ झाली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Pune Rain: पुण्यातील एकता नगर, निंबजनगरमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, नागरिक अडकले

पुण्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार पाण्यावर तरंगताना दिसत आहे.  निंबजनगर भागात छातीपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांची रेस्क्यू बोटींद्वारे सुटका केली जात आहे.

Kolhapur Rain Video: कोल्हापुरातील पंचगंगा नदीने गाठली धोक्याची पातळी

Pune Rain VIDEO: पुण्यातील निंबजनगरमध्ये भीषण परिस्थिती, छातीपर्यंत पाणी

Pune Rain: पुण्यातील परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता

पुण्यातील परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता, खडकवासला धरणातून आणखी पाणी सोडणार, धडकी भरवणारी परिस्थिती. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. एकता नगर परिसर, डेक्कन परिसर, निंबजनगर या परिसरात मोठ्या प्रमाणावर लोक अडकले आहे.   सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Maval Rain: मावळमधील कुंडमळा येथे पर्यटकांना बंदी

मावळ तालुक्यात काल पासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे असणारी इंद्रायणी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळा येथे पाणी साकव पुलापर्यंत आले आहे. कुंडमळा परिसरात असणाऱ्या कुंडदेवी मातेचे मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. कुंडमळा परीसरात वर्षाविहार करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र कुंडमळा येथे पाण्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांना येथे बंदी घालण्यात आली आहे.

Pune Rain: ताम्हिणी घाटात दरड कोसळली

रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार  पावसामुळे ताम्हिणी घाटात  मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसेच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावर माती आलेली आहे. त्यामुळें किमान सहा ते आठ तास रस्ता सुरळीतपणे सुरू होण्यासाठी लागण्याची शक्यता सबंधित विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. ताम्हिणी घाटातील माणगाव हद्दीत रस्त्यावर आलेली माती जेसीबी द्वारे बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर दूसरीकडे पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे.

'पुण्यात पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही'; सुप्रिया सुळे संतापल्या, प्रशासनाच्या चुकीवर ठेवलं बोट

पुण्यातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आणि भयानक आहे. मला आश्चर्य वाटलं, जेव्हा मंत्री पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असं बोलत आहे. सर्व यंत्राणा कामाला लागली आहे. त्याबद्दल मी मंत्रींचे आभार मानते. परंतु नियंत्रणात काहीही नाही. लोक पॅनिक झाले आहेत. लोकांकडे खाण्यासाठी-पिण्यासाठी काहीही नाहीय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Pune Rain: भिमाशंकर राजगुरुनगर मार्गावर दरड कोसळली

भिमाशंकर मार्गावर दरड कोसळली असून राजगुरुनगर मार्गे भिमाशंकरला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. अनेक गावांना दरड कोसळण्याचा धोका. भिमाशंकर राजगुरुनगर मार्गावर मोरोशी शिरगाव फाट्यावर दरड कोसळल्याची दुदैवी घटना घडली असून बाजुलाचा असणारा जनावरांचा गोठा थोडक्यात बचावला असून प्रशासनाकडून दरड काढण्याचे काम चालू असून राजगुरुनगर मार्गे भिमाशंकरला जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा जोर किंचित ओसरला

पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या तासाभरापासून पावसाची विश्रांती, यामुळं सखल भागातील पाणी ओसरायला सुरुवात.

Satara Rain: कोयना धरणाचे दरवाजे उघडणार

कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस. धरणात प्रतिसेकंदाला 75 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक. धरणातील आवक पहाता कोयना धरणाचे दरवाजे आज उघडणार. आज 4 वाजता दीड फुटाने दरवाजे उघडणार. 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार कोयना नदीपात्रात. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरणात 75,26 टीएमसी पाणीसाठा. गेल्या 24 तासात कोयना धरण क्षेत्रात 237 मिलिमीटर पाऊस झाला तर महाबळेश्वर परिसरात 307 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Baramati Rain: वीर धरणाचे दरवाजे आज 4 वाजता उघडणार

वीर धरणाचे दरवाजे आज 4 वाजता उघडणार.वीर धरणात 7 टीएमसी पाणीसाठा. 1 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुण्यात आभाळ फाटलं, सिंहगड रोड परिसरात छातीपर्यंत पाणी, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवल्या

पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याने अनेक घरांत पाणी साचलं आहे, रस्त्यावरील गाड्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Solapur Ujni Dam: उजनी धरण आज प्लसमध्ये येणार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! उजनी धरण आज प्लसमध्ये येणार, मोठ्या प्रमाणात धरणात विसर्ग सुरु, सध्या पाणीसाठी किती? सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

पुण्यात पावसाचा हाहा:कार, झेड ब्रिजखालच्या पुलाच्या वाडीत अनर्थ घडला

पुण्यात पावसाचा हाहा:कार, झेड ब्रिजखालच्या पुलाच्या वाडीत अनर्थ घडला, अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा वीजेचा करंट लागून मृत्यू. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

पार्श्वभूमी

पुणे: पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने नद्यांना पूर आला आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे मुठा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. तर कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली आहे. कोयना आणि राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.