Pune News: कुटुंबीयांचा एक धाडसी निर्णय अन् पुण्यातील रिक्षाचालकाचं ह्रदय थेट गुजराती व्यक्तीला; ब्रेन डेड व्यक्तीचं ह्रदय दान करत दिलं जीवनदान
पुण्यातील चिखली येथील 28 वर्षीय ऑटो रिक्षा चालक होता. त्याला डोक्याला दुखापत झाल्याने मेंदू मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या एका निर्णयामुळे सुरत मधील एकाला जीवनदान मिळालं आहे.

Pune News: पुण्यातील चिखली येथील 28 वर्षीय ऑटो रिक्षा चालक होता. त्याला डोक्याला दुखापत झाल्याने मेंदू मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या एका निर्णयामुळे सुरत मधील एकाला जीवनदान मिळालं आहे. ह्रदय दान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आणि ह्रदयाने पुणे ते सुरत प्रवास करुन जीवनदान दिलं आहे. सुरत शहरातील बीडी मेहता महावीर हार्ट इन्स्टिट्यूट येथे ह्रदय प्रत्यारोपण करण्यात आल्याने हृदयविकाराने ग्रस्त 35 वर्षीय व्यक्तीला नवीन जीवन मिळाले. यामुळे या तरुणाच्या किडनी, लिव्हर, हृदय, फुफ्फुसं आणि दोन्ही डोळे दान करण्यात आले. या माध्यमातून अनेक रुग्णांना फायदा झाला.
दोन तासात ह्रदय सुरतमध्ये
सुरतच्या महावीर हार्ट इन्स्टिट्यूटच्या पथकाने पुण्यातील डॉ डी वाय पाटील रुग्णालयात 28 वर्षीय व्यक्तीचे हृदय यशस्वीरित्या काढले आणि पहाटे 5:30 वाजता चार्टर्ड फ्लाइटमध्ये अवयव घेतला. सकाळी 7:30 वाजता हृदय सुरतला पोहोचले. प्रत्यारोपणाची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू झाली आणि दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण झाली, असे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
28 वर्षीय तरुणाला 20 ऑगस्ट रोजी डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या अपघात विभागात आणण्यात आले होते. मात्र 21 ऑगस्ट रोजी त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. दहीहंडीदरम्यान हा तरुण त्याच्या मित्रासोबत बाहेर पडला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली.
किडनी, लिव्हर, हृदय, फुफ्फुसं दान
फुफ्फुस यशस्वीरित्या हैदराबादच्या KIMS रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. डी.वाय.पाटील रुग्णालयातील प्रतीक्षा यादीतील रुग्णामध्ये एक किडनी प्रत्यारोपण करण्यात आली आणि ससून रुग्णालयात दुसऱ्या रुग्णामध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. डीवाय पाटील रुग्णालयात 65 वर्षीय महिलेला यकृतही प्रत्यारोपण करण्यात आले.
2017 पासून पुण्यात 38 ह्रदय प्रत्यारोपण
पोलिसांनी कोणताही वाईट प्रकार घडण्याची शक्यता नाकारली होती आणि त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत कशी झाली हे कळणं शक्य नव्हतं. एका मित्राने त्याला घरी आणले पण जेव्हा तो उठला नाही तेव्हा त्यांनी त्याला 20 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान ब्रेन डेड झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तरुणाचे अवयव दान करण्यासाठी नातेवाईकांना समुपदेशन करण्यात आले आणि नातेवाईकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेत जीवनदान देण्याचं ठरवलं. 2017 पासून पुण्यात 38 ह्रदय प्रत्यारोपण करण्यात आल्याची माहिती आहे.
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?






















