पुणे : हिंजवडी येथील एका 23 (Pune Crime News) वर्षीय तरुणाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. योगेश अभिमन्यू साखरे असे मृताचे नाव असून तो हिंजवडी येथील रहिवासी आहे. तो हनुमान तालीम मित्र मंडळाशी संबंधित होता.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरला हृदयविकाराचा त्रास होता आणि डॉक्टरांनी त्याला उपचाराचा सल्ला दिला होता, त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास तो हिंजवडीजवळ मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने औषध खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये धाव घेतली तिथेच तो कोसळला. ही परिस्थीती पाहू स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना औंध रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता.
योगेश साखरेचा औंध रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. साखरे हा विसर्जन मिरवणुकीपासून किमान 25-30 मीटर अंतरावर होते त्यामुळे उच्च डेसिबल आवाज आणि त्यांचा अकाली मृत्यू यांचा काहीही संबंध नसल्याचंदेखील पोलिसांनी सांगितलं आहे.
सांगलीत दोघांचा मृत्यू...
सांगली जिल्ह्यात (Sangli News) दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला. दोन तरुणांच्या या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीमधील डीजेचा दणदणाटही कारणीभूत ठरला. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे (वय 32, रा. कवठेएकंद) आणि वाळवा तालुक्यातील दुधारीमधील प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी) या तरुणांचा सोमवारी रात्री झाला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला. यामधील शेखर पावशेची 10 दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती.
अति उत्साह अन् आवाज जीवावर बेतले...
राज्यात जल्लोषात गणेशोत्सव 10 दिवस पार पडला मात्र शेवटच्या दिवशी या गणेशोत्सवाला आवाजामुळे आणि अति उत्साही कार्यकर्त्यांमुळे गालबोट लागलं. सध्या सगळ्या मंडळांमध्ये आवाजात आणि डॉल्बी सिस्टिमवरुन स्पर्धा दिसून येते. कोणाचा आवाज मोठा यावरुन अनेकदा वाद बघायला मिळतो. मात्र हाच आवाज अनेकांचा जीव घेत असल्याचं मागील काही वर्षांत घडलेल्या घटनांमधून समोर आलं आहे.
इतर महत्वाची बातमी-