Pune Ganesh Visarjan : शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सहा तासावरून गेली एकतीस तासांवर; 1948 पासून ते 2025 पर्यंत कुठल्या वर्षी मिरवणुकीला किती वेळ लागला?
Pune Ganesh Visarjan : सरासरी 30 तासांचा विक्रम यंदा मोडीत निघाली आहे. यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरल्याच्या चर्चा आहेत. पुणे पोलिसांचं सुक्ष्म नियोजन फसलं का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

पुणे: पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातून 3 वाजेपर्यंत 232 गणपती मंडळ विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. अजून 9-10 मंडळ या अलका टॉकीज चौकातून मार्गस्थ व्हायचे आहेत. 30 तास उलटून गेले तरी मिरवणूक सुरूच आहेत. भर पावसात भिजत, नाचत, वाजत गाजत पुणेकरांचा बाप्पला निरोप दिला जात आहे. शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सहा तासावरून गेली एकतीस तासांवर गेली आहे. दरवर्षी पेक्षा यावर्षी जास्त वेळ लागला आहे. 1984 पासुनची आकडेवारी बघितली तर गणपती विसर्जन मिरवणुकीच्या तासात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सरासरी 30 तासांचा विक्रम यंदा मोडीत निघाली आहे. यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरल्याच्या चर्चा आहेत. पुणे पोलिसांचं सुक्ष्म नियोजन फसलं का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
1948 पासून ते 2025 पर्यंत कुठल्या वर्षी मिरवणुकीला किती वेळ लागला.
वर्ष तास
1948 6 तास 30 मी
1949. 8 तास
1952 9 तास 15 मी
1953. 9 तास 30 मी
1954. 11 तास
1967. 17 तास 24 मी
1978 21 तास 30 मी
1989. 29 तास 25 मी
2005 33 तास 20 मी
2016 ते 2019 28 तास 15 मी
2020 ते 2021 कोरोनामुळे मिरवणूक नाही.
2022. 31 तास
2024 30 तास 15 मी
2025 अजून मिरवणूक सुरू
2024 साली पुण्यातील मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक 10 वाजता सुरु झाली होती. त्यावेळी विसर्जन किती वाजता झालं होतं?
मानाचा पहिला कसबा गणपती - 4:35 वाजता म्हणजे 6 तास 35 मिनिटं मिरवणूक चालली
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती - 5:10 वाजता म्हणजे 7 तास 10 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती - 6:44 वाजता म्हणजे 8 तास 44 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती - 7:15 वाजता म्हणजे 9 तास 15 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती - 7:33 वाजता म्हणजे 9 तास 33 मिनिटं मिरवणूक चालली.
यंदा मिरवणूक 9:30 वाजता सुरु झाल्या आणि 5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी मिरवणूक संपली तर गेल्या वर्षी 10 वाजता सुरु झालेल्या मिरवणुका 9 तास 33 मिनिटं चालली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मानाच्या गणपतींची मिरवणूक 1 तास 24 मिनिटं आधी संपली.
























