एक्स्प्लोर

Pune Ganesh Visarjan 2025: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळेत बदल होणार? प्रत्येक मंडळासोबत एकच ढोलपथक? महत्त्वाची अपडेट समोर

Pune Ganesh Visarjan 2025: मानाच्या गणपतींमुळे आमच्यावर अन्याय होत असल्याच या मंडळा़च म्हणणय.त्यामुळे विसर्जनाच्या वेळापत्रकात आणि मिरवणूक रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

Pune Ganesh Visarjan 2025: पुण्यातील पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनाआधीच इतर मंडळांना मिरवणुकीत सहभागी होऊ द्यावे, अशी मागणी अनेक मंडळांनी केली आहे. याशिवाय, प्रत्येक गणेश मंडळासोबत स्वतंत्र ढोल-ताशा पथक न देता एकाच पथकाचा वापर करावा, अशी सूचनाही समोर आली आहे. (Ganesh Visarjan 2025)

पुण्यातील  गणपती मंडळाची सकाळी सात वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक निघणार आहे. मानाचे पाच गणपतीही सकाळी सात वाजल्यापासून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. पुण्यातील गणेश मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. विसर्जन मिरवणुकींना होणारा उशीर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं समोर येतंय. मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन फोन शहरातील इतर शेकडो गणेश मंडळांच्या गणपतीचं विसर्जन होण्यासाठी संध्याकाळ होते. त्यामुळे त्यांची वाद्य ढोल पथक मिरवणुका करण्यासाठी दुसऱ्या दिवशीपर्यंत मिरवणूक लांबते. त्यामुळे इतर गणेश मंडळांनी एकत्र येत पुण्यात बैठक घेतली. यात पुण्यातील पाच मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका या सकाळी सात वाजता व्हाव्यात, जर त्या होणार नसतील तर इतर मंडळ सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूक काढायला तयार आहेत असं या बैठकीत मांडण्यात आलं.

नेमकं होणार काय?

बाळासाहेब ठाकरे कलादालनात झालेल्या बैठकीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असून,पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणार असल्याच जाहीर केलय. मानाच्या गणपतींमुळे आमच्यावर अन्याय होत असल्याच या मंडळा़च म्हणणय.त्यामुळे विसर्जनाच्या वेळापत्रकात आणि मिरवणूक रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या बैठकीला 70 पेक्षा अधिक मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीला लागणारा वेळ पाहता पाच मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणूकीत सहभागी होण्याची इच्छा काही गणेश मंडळांनी व्यक्त केलीय.

पुण्यातील लक्ष्मी रसत्यावरील विसर्जन मीरवणूकीत 300 पेक्षा अधिक गणेश मंडंळं सहभागी होतात. मात्र पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन होईपर्यंत संध्याकाळ होते. पुण्याची विसर्जन मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरु होते. मात्र यावेळी अनेक मंगळांनी पाच मानाच्या गणपतींच्या आधी सात वाजल्यापासुन मीरवणूकीत सहभागी होण्याची तयारी दर्शवलीय. त्याचबरोबर प्रत्येक मंडळाने एकच ढोल ताशा पथक वापरावे याबद्दल देखील या बैठकीत चर्चा झालीय.पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणार असल्याच जाहीर केलय. मानाच्या गणपतींमुळे आमच्यावर अन्याय होत असल्याच या मंडळा़च म्हणणय.

प्रत्येक मंडळासोबत एकच ढोलपथक?

यंदा प्रत्येक मंडळासाठी एकच ढोल-ताशा पथक असावे, अशी सूचना बैठकीत मांडण्यात आली. यामुळे विसर्जन मिरवणूक अधिक वेगाने पुढे सरकू शकते आणि तांत्रिक अडचणीही कमी होतील, असंही मत मांडलं गेलं. दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक वर्षी 300 हून अधिक गणेश मंडळं सहभागी होतात. त्यामुळे मिरवणुकीचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. वेळेचं बंधन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वेळेत विसर्जन पार पाडणं आवश्यक असतं. सदर बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंतिम रूपरेषा लवकरच पुणे पोलिस प्रशासनासोबत होणाऱ्या बैठकीत मांडली जाणार आहे. त्या अनुषंगानेच विसर्जनाच्या वेळा, मंडळांचा क्रम आणि ढोल-ताशा पथकांचा नियोजन स्पष्ट होणार आहे. गणेश विसर्जन 2025 मध्ये बदल पाहायला मिळणार का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Embed widget