एक्स्प्लोर
Pune Fire News : पुण्यातील कोथरुडमधील श्रावणधारा इमारतीला भीषण आग
Pune Fire News : पुण्यातील कोथरुडयेथील श्रावणधारा इमारतीला आग लागली असून अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Maharashtra Pune Fire News : पुण्यातील कोथरुडमधल्या श्रावणधारा इमारतीतील सातव्या आणि आठव्या मजल्यावर आग लागली आहे. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
पुण्यातील कोथरुडमधील श्रावणधारा सोसायटीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील काही फ्लॅट्सना आग लागली आहे. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग लागलेल्या फ्लॅट्समधील आठ ते दहा लोकांना खाली आणण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोथरुडमधील आशिष गार्डनजवळ ही सोसायटी आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement