पुणे : लिफ्टमधे अडकलेल्या लहान (Pune Fire) मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पुण्यातील भवानी पेठेत राहणाऱ्या मुलाची सुटका केली. अचानक लिफ्ट बंद झाल्याने मुलगा लिफ्टमध्येच अडकला होता. त्यानंतर ही माहिती लगेच अग्निशमन दलाला मिळाली आणि अवघ्या 20 मिनटात अग्निशमन दलाने सुटका या मुलाची सुटका केली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 9 वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात भवानी पेठ येथे इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक मुलगा अडकल्याचा फोन आला. अग्निशमन मुख्यालयातून तातडीने फायरगाडी आणि रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आल्या.
कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एक लहान मुलगा सहा मजली असणाऱ्या इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट बंद झाल्याने अडकला आहे. जवानांनी मुलाला आवाज देत त्याच्याशी संवाद सुरू ठेवत लिफ्ट रुममधे जाऊन तांत्रिरकरित्या कार्य पार पाडत लिफ्ट पहिल्या मजल्यावर समांतर घेऊन दलाकडील स्प्रेडरचा वापर केला आणि लिफ्टचा दरवाजा उघडत लहान मुलाची 20 मिनिटात सुखरुप सुटका केली. त्यामुळे मुलांच्या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला. काही वेळासाछी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र अग्रिशमन दलाच्या जवावांच्या कार्यामुळे परिस्थिती हाताळणं कुटुंबियांनादेखील सोपं गेलं.
पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी बजावली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले यांनी देखील कुटुंबीयांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबीयांना सोबत घेत गाडीची आग विझवली होती. त्यांनी कुटुंबीय सोबत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टीवर असताना केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झालं होतं. पुण्यातील उंड्री परिसरात रात्री एका चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी ऑफ-ड्युटी असलेला अग्निशमन दलाचा जवान मदतीसाठी आला. पेटलेली गाडी पाहून त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. मग धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता.
इतर महत्वाची बातमी-