पुणे : पुणे (Pune News) शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. आठ महिन्यात पुणेकरांनी 20 कोटी पेक्षा जास्त रुपये गमावले आहे. पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे आत्तापर्यंत जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट या आठ महिन्यात 1114 विविध गुन्ह्यांचे अर्ज हे आले असून यात फक्त ऑनलाईन टास्क या गुन्ह्यात 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे.


मोबाईलवर तातडीने कर्ज उपलब्ध असल्याचे अनेक मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये येतच असतील. कोरोना काळानंतर तर नोकऱ्या गेल्यानंतर तातडीने पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी अगदी दोन ते पाच हजार रूपयांची कर्ज मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातात. कर्ज घेतलं आणि पैसे परतफेड करताना उशीर झाला किंवा अगदी पैसे परत फेडले तरी जास्त पैसे उकळण्यासाठी तुमच्या गॅलरीतले आप्तेष्टांचे फोटो मॅार्फ करून ते ओळखीच्या लोकांन घाणेरडा मजकूर लिहून पाठवले जातात.  शेवटी हे थांबवण्यासाठी पुन्हा पैश्यांची मागणी केली जाते.  यापध्दतीने शेकडोंची फसवणूक रोज होतेय.  


लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी सामान्य नागरिक मिळेल त्या मार्गाने पैसे मिळवायच्या प्रयत्नात असतात आणि याचाच गैरफायदा हे ऑनलाईन लोन देणारे सध्या घेताना दिसत आहेत. तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यायचे आणि त्याच व्यक्तीला काही दिवसांच्या आत ब्लॅकमेलिंग करायचे असे उद्योग सध्या पुण्यासारख्या शहरात सर्रास सुरू आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिक पोलिसांकडे धाव घेत आहेत मात्र त्यांच्या हाती लागते ती म्हणजे घोर निराशा. 


पुणे शहरात जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट या आठ महिन्यात गुन्ह्यांचे प्रकार काय?



  • मनी ट्रान्स्फर: 56

  • केवायसी अपडेट: 42

  • क्रिप्टोकरन्सी: 58

  • इन्शुरन्स फसवणूक: 10

  • जॉब फसवणूक: 31

  • शेअर मार्केट फ्रॉड: 27

  • लोन फ्रॉड: 29

  • ऑनलाईन सेल आणि परचेस फ्रॉड: 62

  • फेक प्रोफाईल: 85

  • फेसबुक हॅकिंग: 34

  • सेक्सटॉर्शन: 35


पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे गेल्या अनेक महिन्यात  फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र तपास अजूनही अधांतरीच दिसत आहे. केवळ तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ॲानलाईन फसवणुकीचे अर्थात फिशींग  अनेक नवीन प्रकार या सायबर चोरट्यांनी आजमावले आहेत आणि याला नाहक बळी पडतोय तो म्हणजे सामान्य नागरिक. तुमच्या मोबाईल फोन ची गॅलरी तारण ठेऊन कर्ज देणे हा तोच प्रकार आहे. पोलिसांपेक्षा ॲानलाईन फसवणूक करणारे जास्त वेगवान झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. या फसवणुकीत आपण फसणार नाही ना ही काळजी आता तुम्हालाच घ्यावी लागणार आहे त्यामुळे सावधान रहा आणि सतर्क राहा..


गुंतवणूक करताना काळजी घ्या... 


अशा प्रकारच्या अनेक गुंतवणुकीचं आमिष दाखवणाऱ्या कंपन्या पुण्यात आहे. या कंपन्यांकडे अनेकांची यादी असू शकते. त्यामुळे कोणत्याही कंपनींत किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.


हे ही वाचा :


Nagpur Online Fraud : व्यापाऱ्याची 58 कोटींची फसवणूक करुन दुबईत पळ, सोंटू जैन आता दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या तयारीत?