एक्स्प्लोर

Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू

Hormuz ship attack: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाची प्रत्यक्ष झळ आता महाराष्ट्राला बसताना दिसत आहे. पुण्यातील अभियंते हेरंब करमरकर यांचा जहाजावरील हल्ल्यात मृत्यू

Iran America War in strait of hormuz: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाची चिंता वाढवणाऱ्या इराण आणि अमेरिका यांच्यातील आखातातील युद्धाची झळ आता महाराष्ट्राला आणखी तीव्रपणे जाणवू लागली आहे. काही दिवसांपूर्वी या युद्धामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली. या आर्थिक फटक्यानंतर आता इराण-अमेरिका युद्धात (War) भारतीयांची जीवितहानी होऊ लागली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात करार झाल्याची चर्चा असतानाच काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला होता. अमेरिका आणि इराण (Iran) यांनी परस्परांच्याविरोधात जोरदार हल्ले सुरु केले होते. इराणकडून अमेरिकेचे मित्र असलेल्या आखातामधील देशांना लक्ष्य केले जात आहे. अशाच एका हल्ल्यात पुण्यातील एका अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Iran America War)

होमुर्झच्या सामुद्रधुनीत एका जहाजावर हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर (Heramb Karmarkar) या अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. एम व्ही जी एफ एस गॅलेक्सी या नौकेवर काम करत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या नौकेवर हल्ला झाला.  हवाई हल्ल्यामुळे जहाजाच्या इंजिन रुमजवळ आग लागली. त्यावेळी हेरंब करमरकर इंजिन रुमजवळ होते. या  नौकेवरील 24 पैकी 23  जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली. मात्र, हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. रविवारी हल्ला होण्यापूर्वी त्यांचे पुण्यातील कुटुंबाशी बोलणे झाले होते. रविवारी रात्री 2 वाजून 50 मिनिटांनी त्यांचं कुटुंबीयांसोबत शेवटचं बोलणं झालं होते. यानंतर मंगळवारी हेरंब यांच्या कंपनीकडून त्यांचे नातेवाईक रविंद्र टंडन यांना फोन करुन हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.  ही बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

आखाती देशांच्या परिसरात सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेने इराणमधील अनेक प्रमुख ठिकाणांना ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्रांचा मारा करुन लक्ष्य करण्याचा सपाटा लावला आहे. इराणकडून अमेरिकेला थेट लक्ष्य करणे शक्य नसल्याने अमेरिकेचे तळ असलेल्या आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांना लक्ष्य केले जात आहे. याशिवाय, होमुर्झच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांनाही इराणकडून लक्ष्य केले जात आहे. हेरंब करमरकर यांच्या जहाजावर झालेला हल्ला हादेखील इराणकडून करण्यात आला असावा, अशी शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने एका जहाजावर केलेल्या हल्ल्यात काही भारतीयांचा मृत्यू झाला होता. 

आणखी वाचा

सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget