पुणे :  पुण्यातील L3 लॉऊन्ज पब प्रकरणात (Pune Drugs)  दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलंय. या पबमधील व्हिडीओमध्ये ड्रग्स घेताना दिसत असलेल्या दोन्ही तरुणांना पुणे आणि मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. एका तरुणाला पुणे पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं.  दुसऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून ताब्यात घेतलं. सध्या त्यांची चौकशी सुरु असल्याची समजतं.बाथरुममध्ये ड्रग्ज घेत असलेल्या तरुणांना पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने ताब्यात घेतलं आहे. 


एफसी रोडवरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या  दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत.  दोघे ही तरुण 24-25  वर्ष वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  हे दोन्ही तरुण एकमेकांचे मित्र असल्याची माहिती आली समोर आहे. रात्री 1.30  वाजता या तरुणांनी केली L3 बार मध्ये एन्ट्री केली होती.  बाथरुममध्ये  ड्रग्ज घेणारा दुसरा तरूण देखील पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.  त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्यासोबत असलेला दुसरा तरूण हा मुंबईतील असल्याचे सांगितले.  त्यानंतर दुसऱ्या तरुणाला पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले आहे.   सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.   


FC रस्त्यावरील हॉटेल आणि पबच्या बाहेर असलेल्या अतिक्रमणावर कारवाई


पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने FC रस्त्यावरील हॉटेल आणि पबच्या बाहेर असलेल्या अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.  


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याच निलंबन


ड्रग्ज प्रकरणत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याच निलंबन करण्यात आले आहे.  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस सहनिरीक्षकांचं निलंबन करण्यात आले आहे.   पुण्यातील L3 बारमध्ये सुरू असलेल्या पार्टी संदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन  करण्यात आले आहे.  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी जारी केले त्यांच्या निलंबनाचे निर्देश दिले आहे.  


नेमकं काय आहे प्रकरण?


पुण्यातील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक असलेल्या एफ सी रोडवरील या लिक्विड लेझर लाउंज या पबमधे ड्रग्ज घेतलं जात असल्याचं उघड झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत . पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत या हॉटेलचा , मालक , मॅनेजर , कर्मचारी आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्या व्यक्तींसह आठ जणांना अटक केलीय. रात्री एक वाजेपर्यंत पब सुरु ठेवण्यास परवानगी असताना पाठीमागच्या दराने रात्री दीड वाजता पन्नास जणांना या पबमधे प्रवेश देण्यात आला . या पार्टीमध्ये आलेले पन्नास जण शनिवारी संध्याकाळी हडपसरमधील कल्ट या पबमधे पार्टीसाठी जमले होते.


Pune Drug Case Video :



हे ही वाचा :


Pune Drugs: 50 तरुणांचा ग्रुप ड्रग्ज पार्टीसाठी हडपसरहून FC रोडला, रात्रीच्या अंधारात ड्रग्जचा खेळ; आतापर्यंत काय काय घडलं?