Pune Crime : बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून प्रेयसीच्या भावाने प्रियकरांच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे.  कटाळू कचरू लहाडे असे मृत व्यक्तीचे नाव असून पुण्यातील (Pune Crime) येरवडा भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचा भाऊ इस्माईल शेख ( 25 वर्षे)  याला ताब्यात घेतले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. 


पुण्यातील येरवडा भागात ही  धक्कादायक घटना घडली आहे.  लहाडे व शेख कुटुंबीय एकाच परिसरात वास्तव्यास आहे. कटाळू यांचा मुलगा आणि इस्माईल याची बहिण या दोघांमध्ये मैत्री होती. आज सकाळी कटाळू यांचा मुलगा व संबंधित तरुणी घरातून निघून गेले. बहिणीला कटाळू यांच्या मुलानेच पळवून नेल्याचा संशय इस्माईल याला आला. त्या रागातूनच आज कटाळू याच्यावर इस्माईल याने रागातून धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.


नेमकं काय घडले?


 मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने बहिणीला फूस लावून पळवून  नेऊन आंतरधर्मीय विवाह  केल्याच्या रागतून मुलीच्या भावाने टोकाचे पाऊल उचलले आहे. तरुणीचा भाऊ  इस्माईल शेखने कोयत्याने सपासप वार केले आहे. लहाडे  उभे असताना  दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने लहाडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये लहाडे यांच्या डोक्याला आणि हातावर वार केल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मृत लहाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.  एकीकडे कोयता गँग,  ड्रग्ज प्रकरणाने पुण्याचे वातावरण तापले असताना या भयंकर घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.  घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 


पुण्यात कोयता गँगचा धुडगूस


गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगचा धुडगूस पाहायला मिळतोय.   गेल्या काही महिन्यांपासून गल्ली पासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा  पुण्यातील "कोयता गँग". पुणे शहरातील अनेक भागात तरुणांच्या टोळ्या हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. खंडणी वसूल करणे, धमकावणे, दहशत निर्माण  करण्यासाठी शहरातील अनेक भागात हे तरुण हातात कोयते घेऊन फिरताना दिसतायत. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहेच शिवाय व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता आहे.  


हे ही वाचा :


Crime News : पाण्याच्या टँकरमध्ये सापडला मृतदेह, महिलेची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न; पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंच