पुणे : पुणे अंतराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट
पुण्यात देशातील सगळ्यात मोठं ड्रग्ज रॅकेट समोर आलं. त्यात 4000 कोटी रुपयांचं ड्रग्स पुणे पोलिसांनी विविध ठिकाणाहून जप्त केलं. हे ड्रग्ज पुणे जिल्ह्यातील कुलकुंभमध्ये असलेल्या कारखान्यात तयार करण्यात येत होतं. तिथून हे ड्रग्ज देशातील विविध भागात आणि विदेशात पुरवण्यात येत असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता हे ड्रग्स फूड कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून पाठवले जात होते.
दिल्लीतील 2 जणं अधिकृत फूड कुरिअरचां व्यवसाय करत होता. याच्या माध्यमातून हे पार्सल पाठवलं जात होतं. आत्तापर्यंत दिल्लीतून पुणे पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. दिवेश भुटीया,संदीप कुमार, संदीप यादव या 3 जणांवर ड्रग्स लंडनला पाठवण्याची जबाबदारी होती. आतापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
पुणे पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उघड केलं आहे. त्यात 4000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या ड्रग्स रॅकेटचा म्होरक्या सनी उर्फ संदीप धुनिया याचादेखील फोटो पुणे पोलिसांच्या हाती लागलेला आहे. संदीप धुनिया याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात आता इंटरपोलची मदत घेतली जाणार आहे.
आतापर्यंत आठ जणांना अटक
पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय 40, खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसीया (वय 35, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय 40, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय 46, रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (वय 41, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबीवली पश्चिम, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर दिल्ली येथून दिवेश भुतीया (वय 39) आणि संदीप कुमार (वय 42 , दोघेही रा. दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर आयुब अकबर मकानदार याला सांगलीतून अटक करण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी-