पुणे : पुण्यात भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या मालमत्तेवर पालिकेने कारवाई केली आहे.  डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने ही जागा पालिकेने सील केली आहे. मालमत्ता थकबाकीप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. या जागेवरतब्बल 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची थकबाकी होती. सध्या पुणे महापालिका थकित करा प्रकरणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत आहे. 


महापलिकेचे पैसे थकले असतील म्हणून त्यांनी कारवाई केली. त्यात गैर काही नाही. या जागेची थकबाकी भरली नसती तर त्याची वेगळी बातमी झाली असती. आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरणार असल्याचं नितेश राणेंनी सांगितलं आहे.  


महानगरपालिकेकडून गेले काही दिवस पुण्यात अशा पद्धतीने कारवाया सुरू आहेत. ज्या ठिकाणी कोट्यावधी कर थकीत आहेत, त्यांच्यावर अशी ही कारवाई केली जात आहे. अशा कारवाई करताना आधी नोटिफिकेशन पाठवण्यात येते आणि त्याच्यानंतर ही कारवाई केली जाते.  पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये एक मोठा मॉल आहे. यात रेंटवर अनेक वेगवेगळे दुकानं आहेत. याच ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करताना पुणे महानगरपालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोचलेले होते आणि त्यांनी ही कारवाई केली.


पाठपुरावा केला पण...


डेक्कन कॉर्नर येथे राणेंच्या मालकीचा मॉल आहे. तीन मजल्यांवरील दुकानांवर थकबाकी होती. त्यात या मॉलची एकूण 5 कोटी 60 लाख रुपये थकबाकी होती. या संदर्भात पुणे महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला होता. नोटीसदेखील पाठवण्यात आल्या होत्या मात्र तरीही कर भरण्यात आला नाही. त्यामुळे पालिकेने थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला. 


 


पुणे शहरात पाच कोटींच्या आसपास थकबाकी वसूल कऱण्यासारखी आहे. त्यामुळे महापालिकेची मोहीम सुरु करण्यात आली आहे. यात आतापर्यंत 1983 कोटी कर वसुली झाली आहे. त्यासोबतच जप्तीचं प्रमाणही वाढवली आहे. येत्या दिवसांतदेखील अशा प्रकारच्या मिळकतींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितलं आहे. 



इतर महत्वाची बातमी-