पुणे :  पुण्यात (Pune News)  ड्रग्ज विरोधात (Drug Case )  शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)   चांगल्याच  आक्रमक झाल्या असून त्यांनी धरणे आंदोलन सुरू आहे.  पुणे शहराची ड्रग्जच्या विळख्यातून सुटका व्हावी यासाठी  उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shamburaj Desai)  यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी  त्यांनी केली आहे.  तसेच शंभुराज देसाईंच्या नोटिसेवर देखील त्यांनी उत्तर दिले आहे. शंभुराज देसाई  आम्ही  तुमच्या धमकीला घाबरत नाही,तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू, असे उत्तर सुषमा अंधारेंने दिली आहे.


सुषमा अंधारे म्हणाल्या, पुणे विद्येचे माहेरघर म्हटलं जाते,  पण आता याच पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पुण्यात फक्त अधिकृत 23 पब बार आहेत,  ज्याच्याकडे परवाना आहे. यादी  फक्त 23  बारची वाचली, मग 100 बार पब कोणाच्या आशीर्वादने चालतात हे आम्हाला माहीत आहे.


तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू : सुषमा अंधारे


पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत  सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं.  राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो असलेल्या एका खोक्यावर 50 खोके असं लिहिलं होतं.  रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांना थेट अब्रुनुकसानीची नोटीस बजावली होती. या नोटीसीवर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या,  शंभुराजे देसाई तुमच्या धमकीला घाबरत नाही, तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू. कुठल्या तोंडाने तुम्ही नोटिसा पाठवत आहात. नोटिसी पाठवता मग  कारवाई का होत नाही,राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी तुमचे लागेबांधे आहेत. 


चरणसिंग राजपूत यांचं निलंबन करून कारवाई करा, सुषमा अंधारेंची मागणी


 पुण्यातील पब, बारची माहिती आमच्याकडे आहे . तर राज्य उत्पादन शुल्क विभाग चरणसिंग राजपूत यांच्या अधिपत्याखाली कसे चालतात? याची माहिती आमच्याकडे आहे. चरणसिंग राजपूत यांचं निलंबन करून कारवाई केली पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे. 23 अधिकृत पब बार व्यतिरिक्त इतर पब बारवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. 


पुणे ड्रग्जच्या विळख्यात?


पुण्यातील FC रोडवरील L3 - Liquid Leisure Lounge मध्ये पहाटेपर्यंत पार्टी झालेल्या पार्टीमध्ये काहीजण ड्रग्जचे सेवन करताना दिसून आले. तो व्हिडीओ समाज माध्यमांवर झळकला. आता आणखी एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुणे-नगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमध्ये असलेल्या पबमधील असल्याचा दावा करण्यात येत असून तो काही दिवसांपूर्वीचा आहे. व्हिडीओमध्ये तरुणी वॉशरूममध्ये ड्रग्जचे सेवन करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर त्यांचा व्हिडीओ काढणारी महिला त्यांना तुम्हाला ड्रग्ज कसे घ्यायचे, याचा फॉर्म्युला  सांगितला आहे. एकंदरीत पुण्यातील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे असेच म्हणता येईल.


हे ही वाचा :


Pune News : अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल; लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'